क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्लिन चिट मिळाली आहे. या प्रकरणाचा हवाला देत शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी उद्योगपती गौतम अदानी यांचं नाव घेत मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेच्या वतीने शिव संपर्क अभियान सुरू करण्यात आलं आहे. शिव संपर्क अभियानासाठी खासदार हेमंत पाटील डोंबिवलीत आले होते. यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. कार्यक्रमानंतर हेमंत पाटील यांनी माध्यमांशीही संवाद साधला.
अदानी बनले आशियातले सर्वात श्रीमंत व्यावसायिक
हेमंत पाटील यांनी बुलेट ट्रेनच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. ‘कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबनाथ भागातील हजारो चाकरमानी वर्षानुवर्षांपासून लोकल मधल्या जीवघेण्या गर्दीतून प्रवास करतात. त्यांच्यासाठी कधी बुलेट ट्रेन सुरु करावीशी वाटली नाही. महाराष्ट्रातील रेल्वे मंत्री राज्यसभेवर गेले ते ही काही बोलत नाही.”
“महागाईविषयी कुणी बोलत नाही. सर्वसामान्यांचं जगणं अवघड झालंय. त्यावर कुणी बोलत नाही. मूळ प्रश्न बाजूला ठेवून मंदिर मशिद आणि जाती-जातीत तेढ निर्माण करणारे प्रश्न उकरून राज्यातील सरकारला बदनाम केलं जातंय. केंद्रीय तपास यंत्रणा जबरददस्तीने सरकारमधील नेत्यांना त्रास देत अटक करत आहे, हे निषेधार्ह आहे,” हेमंत पाटील म्हणाले.
Gujarat ATS : गुजरातमध्ये पुन्हा 600 कोटींचे हेरॉईन जप्त; पाकिस्तानातून आला साठा
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावर पाटील काय म्हणाले?
माध्यमांशी बोलतना शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी आर्यन खानला एनसीबीकडून क्लिन चिट दिल्याच्या प्रकरणावरही भाष्य केलं.
“शाहरुख खानच्या मुलावर (आर्यन खान) जे आरोप होते, त्यातून तो निर्दोष सुटलेलाच आहे. ज्या अदानीला देशातील २८ पोर्ट दिले. त्याच्याकडे ३० हजार कोटींचं कोकेन सापडलं. त्याला तर फाशी दिली पाहिजे होती. मात्र तो यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहे. त्याच्यावर कारवाई करत नाहीत. जे तुमच्या विरोधात बोलतात त्याच्यावर कारवाई करतात. त्यामुळे हे देश कोणत्या दिशेला घेवून जातात हे बघा,” असं खासदार हेमंत पाटील यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT