Couple Romantic Video Viral : विमानातून आकाशात उंच भरारी घेतल्यानंतर काही प्रवासी लोकांचं मनोरंजन करण्यासाठी भन्नाट कृत्य करतात. विमानातील थक्क करणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. परंतु, इंडिगो विमानातील एका कपलच्या व्हायरल व्हिडीओनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. लाईफस्टाईल इन्फ्लूएन्सर ऐश्वर्या बंसलने इंडिगोच्या विमान प्रवासात असं काही केलं, जे पाहून इतर प्रवाशांनाही आश्चर्याचा धक्काच बसला.(After flying high in the sky, some passengers do crazy things to entertain the crowd. Many shocking videos of the plane are seen going viral on social media. But, a viral video of a couple on an IndiGo flight has raised eyebrows)
ADVERTISEMENT
प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक जण गार्डनमध्ये जातात. पण ऐश्वर्याने भर विमान प्रवासात तिच्या प्रियकराला प्रपोज करत किस केलं. तिचं प्रेम यशस्वी होण्यासाठी प्रवासी आणि एयरलाईन्सच्या स्टाफनेही ऐश्वर्याला मदत केली. घुडग्यावर बसून या तरुणीने प्रियकराला एन्गेजमेंट रिंग दिली आणि थेट लग्नासाठी प्रपोज केला. प्रियकर विमानात बसल्यानंतर ऐश्वर्याने त्याला सर्वांसमोर मोठं सरप्राईज दिलं. ऐश्वर्याने हा रोमॅन्टिक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
हातात रिंग बॉक्स घेऊन ऐश्वर्या प्रियकराजवळ गेली अन्...
हातात रिंग बॉक्स घेऊन ऐश्वर्या प्रियकराजवळ गेली आणि गुडघ्यांवर बसून तिने प्रपोज केला. इतकच नव्हे तर ऐश्वर्याने प्रियकराला प्रपोज केल्यानंतर लग्नाचीही मागणी केली. तु माझ्याशी लग्न करशील का? असं ऐश्वर्याने तिच्या प्रियकराला विचारलं. त्यानंतर प्रियकरानेही या तरुणीच्या प्रपोजलला सकारात्मक प्रतिसाद दिला. ऐश्वर्याने प्रपोज करताच प्रियकराने क्षणाचाही विलंब न लावता हो म्हटलं. त्यानंतर प्रेमीयुगुलांनी एकमेकांना मिठी मारून किस करत प्रेम व्यक्त केलं.
ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलंय, अरे देवा..मला त्याला वेगळ्या पद्धतीन सरप्राईज द्यायचं होतं. पण प्रेम व्यक्त करण्याची ही कल्पना अचानक माझ्या मनात आली. विमानातील कर्मचारी यासाठी मला परवानगी देतील की नाही, याबाबत मला खात्री नव्हती. पण पुढे काय घडलं, ते तुम्हाला माहितच आहे.विमानातील क्रू मेम्बर्सनेही प्रेमीयुगुलांच्या भावना समजून घेतल्या. तरुणी विमानात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी मोठी घोषणा केली.
विमानातील कर्मचारी म्हणाले, प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रवासात असलेल्या एका स्पेशल कपलबाबत मोठी घोषणा करत आहोत. इंडिगो स्टाफने या कपलला काही पेपर नोट्स दिले, जेणेकरून हा क्षण त्यांना साजरा करता येईल. एका क्रू ने म्हटलं, प्रिय ऐश्वर्या आणि अमुल्या, तुम्ही या प्रवासाचा एक भाग असलेलं पाहून आनंद वाटला. तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता.
ADVERTISEMENT