ठाकरे सरकारच्या नावाखाली शरद पवारांनी येडं पेरलं आणि खुळं उगवलं-गोपीचंद पडळकर

मुंबई तक

• 08:23 AM • 03 Jun 2021

Corona मुक्त गाव ही योजनाच फसवी आहे. ग्रामीण जनतेच्या दुःखाची सरकारने थट्टा केली आहे. एवढंच नाही तर शरद पवारांनी येडं पेरलं आणि खुळं उगवलं अशी आघाडी सरकारची अवस्था झाली आहे अशीही टीका भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोव्हिड 19 आणि Lockdown मुळे मोडला आहे. कित्येक घरातील कर्त्या माणसांचा यामध्ये मृत्यू […]

Mumbaitak
follow google news

Corona मुक्त गाव ही योजनाच फसवी आहे. ग्रामीण जनतेच्या दुःखाची सरकारने थट्टा केली आहे. एवढंच नाही तर शरद पवारांनी येडं पेरलं आणि खुळं उगवलं अशी आघाडी सरकारची अवस्था झाली आहे अशीही टीका भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

हे वाचलं का?

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोव्हिड 19 आणि Lockdown मुळे मोडला आहे. कित्येक घरातील कर्त्या माणसांचा यामध्ये मृत्यू झाला. त्यांच्या घरातील दुःखी माणसांचे अश्रू पुसण्याऐवजी, त्यांना आधार देण्याऐवजी मंत्र्यांना कोरोना मुक्त गाव अशा स्पर्धा योजना सुचत आहेत . सगळेच जर गावाने करायचे आहे तर सरकारने काय करायचे असा प्रश्न या कामचुकार मंत्र्यांबद्दल मला पडलाय अशी खरमरीत टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारवर केली आहे. यापूर्वी पत्रकार मृत्युमुखी पडल्यास 50 लाख रुपये देणार अशीही योजना आणली होती, प्रत्यक्षात 50 लाख रुपये कधी दिलेच नाहीत तर त्यांच्या घरी जाऊन सांत्वन ही केले नाही त्याच प्रकारची ही कोरोनामुक्त गावांना 50 लाखांचे बक्षीस ही फसवी योजना या सरकारने आणली आहे असंही गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

कोरोनामुक्त गाव स्पर्धेची घोषणा, पाहा किती लाखांचं बक्षीस मिळणार

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोरोनामुळे मोडून पडला आहे. अशात कोरोनावर उपाय योजना करण्याऐवजी स्पर्धा कसल्या घेता? अशा स्पर्धा भरवून गावांची थट्टा करण्याचं काम या ठाकरे सरकारने केलं आहे. या मंत्र्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की जर कोरोनाची जबाबदारी जर दुसऱ्यांवर टाकायची आहे तर मग तुम्ही काय करणार? ज्या काही योजना आहेत त्यामध्ये 22 निकष लावण्यात आले आहेत. सरकारने त्यांच्या जीआरमध्ये 50 लाख रूपये देणार म्हणटलं आहे या घोषणेतच फसवेगिरी आहे असाही आरोप पडळकर यांनी केला आहे. सरकारच्या फसव्या योजनांमधली एक योजना राज्य सरकारने घोषित केली आहे. कोरोना मुक्त गाव स्पर्धा हा राज्य सरकारच्या फसव्या योजनांचाच एक भाग आहे असंही पडळकर यांनी म्हटलं आहे.

कोरोनामुक्त गावांना किती लाखांचं बक्षीस मिळणार?

कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये व 15 लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार.

6 महसुली विभागात प्रत्येकी 3 प्रमाणे राज्यात एकूण 18 बक्षीसे दिली जाणार. यासाठी बक्षीसाची एकूण रक्कम 5 कोटी 40 लाख रुपये असेल.

कोरोनामुक्त गावांना मिळणार विकासकामे

याशिवाय कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना लेखाशिर्ष (2515) व (3054) या योजनांमध्ये प्राधान्य देऊन यामधून प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये व 15 लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजूर केली जाणार आहेत.

स्पर्धेत सहभागी गावांचे विविध 22 निकषांवर गुणांकन करण्यात येणार. यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.

या स्पर्धेत राज्यातील सर्व गावांनी सहभागी होऊन आपले गाव लवकरात लवकर कोरोनामुक्त करावे. असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

    follow whatsapp