देवळा तालुक्यातील लोहोणेर येथील जळीत कांड प्रकरणातील त्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी म्हणजेच 11 फेब्रुवारीला लोहोणेर येथे ही हृदयद्रावक घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केले जात आहे. दिवसाढवळ्या गोरख बच्छाव नामक युवकाला प्रेमप्रकरणातून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यामध्ये हा युवक गंभीर भाजला होता. अखेर रविवारी रात्री अकराच्या सुमारास या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून याप्रकरणी संबंधित मुलीसह पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोरख काशीनाथ बच्छाव असे पीडित तरुणाचे नाव आहे.
ADVERTISEMENT
37 वर्षीय पत्रकाराची पत्नी आणि तीन मुलींच्या देखत चाकूचे वार करून हत्या
तरुणावर का करण्यात आला हल्ला?
गोरख बच्छाव या मुलाचे आणि आरोपी मुलीचे प्रेमसंबंध होते. मात्र, काही कारणाने दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर मुलीचं दुसरीकडे लग्न ठरलं होतं, मात्र ते मोडलं. याच रागातून पीडित तरुणावर हल्ला करण्यात आला.रावळगाव येथील रहिवासी असलेल्या आरोपी मुलीचे देवळा तालुक्यात लोहणेर गावातील गोरख बच्छाव याच्यासोबत सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघे नातेसंबंधातील आहेत. मात्र, दोन महिन्यांपूर्वीच त्यांचं प्रेम प्रकरण संपुष्टात आलं. त्यांचं ब्रेकअप झालं हे मात्र कळू शकलं नाही.
ब्रेकअपनंतर मुलीचं दुसरीकडं लग्न ठरलं होतं. मात्र, काही कारणानं हे लग्न मोडलं. यामागे गोरखचाच हात असल्याचा संशय मुलीला व तिच्या कुटुंबीयांना होता. याच संशयातून त्यांनी गोरखला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
ऑनर किलिंग! पतीने केली पत्नीची हत्या, मुंडकं रस्त्यावर मिरवलं; व्हायरल व्हीडिओमुळे खळबळ
मुलीचे आई-वडील आणि दोन भाऊ यांनी मुलाच्या डोक्यात वार करुन मुलीने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला. त्यानंतर त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात तरुण 55 टक्के भाजल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. देवळा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत युवकाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं. अखेर रविवारी रात्री उशिरा त्याची प्राणज्योत मालवली.
याबाबत देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाचही आरोपी रावळगाव येथील ताब्यात घेण्यात आले आहे. कल्याणी गोकुळ सोनवणे (वय २३), गोकुळ तोगल सोनवणे (वय ५७), निर्मला सोनवणे (वय ५२), हेमंत सोनवणे (वय ३०) आणि प्रसाद सोनवणे (वय १८) अशी आरोपींची नावे आहेत. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण माधवी कामनी, पोलीस उपविभागीय अधिकारी कळवण अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पो.नि. दिलीप लांडगे पुढील तपास करीत आहेत.
ADVERTISEMENT