मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यासही राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्र्यांकडून आज (४ मार्च) दुपारी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे पत्र राज्यपालांना प्राप्त झाले. ज्याला राज्यपालांनी तात्काळ मंजुरी दिली आहे. त्यामुळे अखेर संजय राठोड यांना आपलं वनमंत्री पद गमवावं लागलं आहे.
ADVERTISEMENT
पूजा चव्हाण या 21 वर्षीय तरुणीचं मृत्यूप्रकरण संजय राठोड यांना भोवलं आहे. पूजा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर ज्या 12 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या तेव्हापासून संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी सातत्याने भाजपकडून करण्यात येत होती. अखेर वाढता दबाव लक्षात घेता संजय राठोड यांनी 28 फेब्रुवारीला आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी आज राज्यपालांकडे हा राजीनामा पाठवल्यानंतर त्याला मंजुरी देण्यात आली.
‘या’ प्रकरणामुळे संजय राठोडांना गमवावं लागलं मंत्रिपद –
7 फेब्रुवारी 2021 रोजी पुण्यात 21 वर्षीय पूजा चव्हाण हिने आत्महत्या केली. या प्रकरणात पूजा चव्हाणच्या काही ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. या ऑडिओ क्लिप व्हायरल एक आवाज हा संजय राठोड यांच्याशी मिळताजुळता असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली. त्यातच संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे एकत्र फोटो समोर आल्यानंतर विरोधकांनी शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. याप्रकरणी संजय राठोड यांच्यावर जेव्हा भाजप नेत्यांकडून आरोप करण्यात येत असतान देखील संजय राठोड हे समोर आले नव्हेत. तब्बल 15 दिवसानंतर मीडियासमोर येऊन त्यांनी आपली बाजू मांडली होती.
या ४ कारणांमुळे शिवसेनेला घ्यावा लागला संजय राठोडांचा राजीनामा
पोहरादेवी मधलं शक्तीप्रदर्शनही राठोडांना भोवल्याची चर्चा –
बंजारा समाजाचं देवस्थान असलेल्या पोहरादेवी संस्थान येथे शक्तीप्रदर्शन करत संजय राठोड हे सर्वांसमोर आले होते. यावेळी संजय राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो समर्थक पोहरादेवी संस्थानाच्या परिसरात हजर होते. मात्र, याच्या एक दिवस आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना राज्यात कोरोनाच्या केसेस वाढत असून घराबाहेर पडताना लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचं भान पाळावं असं आवाहन केलं होतं. तसेच राजकीय व धार्मिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली होती. मात्र संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हरताळ फासत पोहरादेवी गडावर शक्तीप्रदर्शन करुन हजारोंचा जमाव गोळा करत राज्य सरकार तोंडघशी पडलं होतं. त्यामुळे राठोडांबद्दल महाविकास आघाडी सरकारमध्ये अधिक नाराजीचं वातावरण निर्माण झालं.
पूजाची आत्महत्या ते राठोड यांचा राजीनामा, वाचा काय काय घडलं?
…अखेर राठोडांना द्यावा लागला राजीनामा
अखेरीस वाढता दबाव लक्षात घेऊन संजय राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांना सोपवला. आपल्यावर गलिच्छ आरोप होत असून चौकशी पूर्ण होईपर्यंत आपण पदावरुन दूर राहणं योग्य असल्याचं म्हणत राठोड यांनी आपला राजीनामा दिला होता.
ADVERTISEMENT