मनिष जोग, प्रतिनिधी, (जळगाव)
ADVERTISEMENT
Jalgaon Youth killed in stone pelting: जळगाव: राज्यभरात तब्बल 7500 ग्रामपंचायती निवडणुकांचे (Grampanchayat Result) निकाल आज जाहीर होत आहेत. मात्र या सगळ्या धामधुमीत एक अतिशय धक्कादायक घटना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील टाकळी या गावात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार टाकळी या गावात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर निघालेल्या विजयी मिरवणुकीत तुफान दगडफेक (stone pelting) झाली. ज्यामध्ये एका नागरिकांचा मृत्यू (Death)झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. (gram panchayat election terrible incident victory procession stone pelted youth dies)
नेमकी घटना काय?
जामनेर तालुक्यातील टाकळी या गावात आज ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी मिरवणूक काढली होती. मात्र याचवेळी ज्या पॅनलाचा पराभव झाला त्या विरोधी पॅनलच्या लोकांनी अचानक विजयी मिरवणुकीवर तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली.
या दगडफेकीत गावातील तरुण धनराज शिवराम माळी याला यामध्ये जबर मार लागला. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. यामुळे त्याला तात्काळ जामनेर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, रस्त्यातच या तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाचा मृतदेह जामनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असून या ठिकाणी त्याचे आप्तस्वकीय प्रचंड आक्रोश करत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे सर्वत्र दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तसेच या घटनेमुळे गावामध्ये प्रचंड तणावाचं वातावरणही पाहायला मिळत आहे.
Gram panchayat Result : पुतण्या पुन्हा काकांवर भारी! होमपीचवर संदीप क्षीरसागरांची बाजी
परभणीतील वाडी-दमई गावातही निवडणूक निकालानंतर दगडफेक
परभणी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकी निकालावेळी एक हिंसक घटना घडली आहे. परभणी जिल्ह्यातील वाडी दमई येथील निकालावरून दोन गटात बाचाबाची झाली. या घटनेदरम्यान एका गटाने दुसऱ्या गटावर दगडफेक केली.
अचानक करण्यात आलेल्या दगडफेकीत चार जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे संपूर्ण परिसराच बराच तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, या प्रकरणाची कुठलीही कल्पना पोलिसांना नव्हती. मात्र, जेव्हा घटनेची माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही बाजूच्या गटातील लोकांना पांगविण्यात आलं.
Gram panchayat Result : भाजपमध्ये २ गट; प्रदेशाध्यक्षांच्या मुलीच्या पॅनेलचा दारुण पराभव
दरम्यान, या दोन्ही घटनेने महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांना गालबोट लागलं आहे. त्यामुळे आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता करण्यात येत आहे. त्यामुळे आता प्रशासन याबाबत कशा प्रकारे कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT