नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी ११ नियमांची करावी लागणार पूर्तता; BMC ने जाहीर केली नियमावली

मुंबई तक

• 01:48 AM • 01 Oct 2021

सार्वजनिक गणेश उत्सवाप्रमाणेच सार्वजनिक नवरात्र उत्सव साधेपणाने साजरा केला जावा असं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील नवरात्र उत्सवात काय काय सूचनांचं पालन करायचं ते मुंबई महापालिकेने पत्रक काढून स्पष्ट केलं आहे. काय आहेत नवरात्र उत्सवासाठीच्या सूचना 1) सार्वजनिक नवरात्र उत्सवासाठी नवरात्र उत्सव मंडळांना मुंबई महापालिकेची पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी ऑनलाईन परवानगी […]

Mumbaitak
follow google news

सार्वजनिक गणेश उत्सवाप्रमाणेच सार्वजनिक नवरात्र उत्सव साधेपणाने साजरा केला जावा असं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील नवरात्र उत्सवात काय काय सूचनांचं पालन करायचं ते मुंबई महापालिकेने पत्रक काढून स्पष्ट केलं आहे.

हे वाचलं का?

काय आहेत नवरात्र उत्सवासाठीच्या सूचना

1) सार्वजनिक नवरात्र उत्सवासाठी नवरात्र उत्सव मंडळांना मुंबई महापालिकेची पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी ऑनलाईन परवानगी यंत्रणा तयार करून ती 23 सप्टेंबरपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. ही संमती विनाशुल्क देण्यात येणार आहे.

2) कोव्हिड 19 या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश आणि मनपाचे धोरण लक्षात घेता मर्यादित आकारमानाचेच मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित आहे. घरगुती आणि सार्वजनिकरित्या स्थापन करण्यात येणाऱ्या देवीच्या मूर्तींची सजावट करताना भपकेबाजी नसावी.

3) देवींची मूर्ती सार्वजनिक मंडळांसाठी चार फुटांपेक्षा जास्त आणि घरगुती मूर्तींसाठी 2 फुटांपेक्षा जास्त नसावी.

4) या वर्षी पारंपरिक देवमूर्तीची किंवा घरातील धातू किंवा संगमरवर आदी मूर्तींचे पूजन केलं जावं. मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन घरच्या घरी करण्यात यावं. ते शक्य नसल्यास नैसर्गिक विसर्जनस्थळी विसर्जन करावं.

5) घरगुती देवमूर्तींचं आगमन हे विसर्जन मिरवणुकीच्या स्वरूपाचे नसावे. आगमनासाठी जास्तीत जास्त पाच व्यक्तींचा समूह असावा. जे उपस्थित असतील त्यांनी मास्क, फेस शिल्ड लावलेलं असावं. तसंच शक्यतो या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले असावेत.

6) सार्वजनिक देवमूर्तींच्या आगमनाच्या वेळी किंवा विसर्जनाच्या वेळी 10 पेक्षा जास्त लोक असणार नाहीत. या सगळ्यांनीही कोरोना प्रतिबंधांचे उपाय अवलंबले पाहिजेत.

7) नवरात्र उत्सवाच्या दरम्यान गरबा, दांडिया याचे आयोजन करू नये. आरती, भजन, किर्तन किंवा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही. तसंच कोव्हिड 19 च्या अनुषंगाने लॉकडाऊन शिथील करण्यातील प्रचलित आदेशांचा भंग होणार नाही याची खबरदारी घेतली जावी.

8) गरबा/सांस्कृति कार्यक्रमांच्या ऐवजी आरोग्य विषयक उपक्रम जसे की रक्तदान शिबीरं किंवा इतर सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करावं. कोरोना, डेंग्यू, मलेरिया इत्यादी प्रतिबंधात्मक उपाय आणि स्वच्छता याबाबत जनजागृती केली जावी.

9) शक्यतो देवीच्या मूर्तीचं दर्शनाची ऑनलाईन सुविधा करण्यात यावी. केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

10) ज्या मंडपात देवी बसली आहे त्या ठिकाणी निर्जुंतीकरण तसंच थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात यावी प्रत्यक्ष दर्शन घेणाऱ्या भाविकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक आहे. तसंच स्वच्छतेचे नियम पाळण्यात यावेत.

11) मंडपाच्या मुख्य भागांचे दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण करावं तसंच कार्यकर्ते आणि इतर व्यक्ती यांच्या वापरासाठी सॅनेटायझर्स ठेवले जावेत. तसंच कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम पाळण्यात यावेत.

    follow whatsapp