महाराष्ट्राचे पळवलेले उद्योग फळाला आले : उद्धव ठाकरेंकडून PM मोदींंचं खोचक शब्दात अभिनंदन

मुंबई तक

08 Dec 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:36 AM)

मुंबई : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. यात एक्झिट पोलमधील अंदाजाप्रमाणे गुजरातमध्ये भाजपनं २/३ बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. गुजरातमध्ये भाजपने तब्बल १५७ जागांवर विजय संपादन केला तर २०१७ तील निकालाच्या तुलनेत काँग्रेसची अवस्था दयनीय झाली आहे. काँग्रेसला केवळ १६ जागांवर समाधान मानवं लागलं. आम आदमी पक्षानेही ५ जागा […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. यात एक्झिट पोलमधील अंदाजाप्रमाणे गुजरातमध्ये भाजपनं २/३ बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. गुजरातमध्ये भाजपने तब्बल १५७ जागांवर विजय संपादन केला तर २०१७ तील निकालाच्या तुलनेत काँग्रेसची अवस्था दयनीय झाली आहे. काँग्रेसला केवळ १६ जागांवर समाधान मानवं लागलं. आम आदमी पक्षानेही ५ जागा जिंकत खातं उघडलं आहे.

हे वाचलं का?

गुजरातमधील याच विजयाबद्दल शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे पळवलेले उद्योग फळाला आले असं म्हणतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंचं खोचक शब्दात अभिनंदन केलं.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

गुजरात विजयाबद्दल मी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान मोदी यांचे खास अभिनंदन करतो. गुजरातचा विजय विक्रमी आणि ऐतिहासिक आहे. गुजरातसोबत हिमाचल प्रदेश विधानसभेचाही निकाल लागला. तिथं काँग्रेसचा दणदणीत विजय झाला आहे. तर दिल्ली ‘मनपा ‘ निवडणुकीत ‘आप’ने भाजपवर मात केली, असं म्हणतं ठाकरे यांनी काँग्रेस, भाजप आणि आपचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

गुजरात विजयाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘गुजरातचा निकाल काहीसा अपेक्षितच होता. गुजरात निवडणूक ही पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्याच नेतृत्वाखाली लढवण्यात आली. त्यामुळेच जनतेने भाजपला भरघोस मतदान केले. त्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत असे दिसते.

पंतप्रधान मोदी हे ११ तारखेला महाराष्ट्रात येत आहेत. मुंबई महानगरपालिकेची निवडणुक डोळ्यासमोर ठेवून ते इथंही भरघोस घोषणा करतील ही अपेक्षा. तसंच आपने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मतविभागणी करून भाजपचा फायदा घडवून आणला हे स्पष्टही झाले. पण असो, ज्याचं त्याचं राजकारण सोयीनुसार चालत असतं, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली.

    follow whatsapp