PM Modi : जनतेच्या आशीर्वादामुळेच गुजरातमध्ये भाजपचा अद्भुत विजय

मुंबई तक

08 Dec 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:36 AM)

गुजरातमध्ये झालेल्या अभूतपूर्व विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जनतेचे आभार मानले आहेत. एवढंच नाही तर हिमाचल प्रदेशमध्ये जनतेने जो कौल दिला तो आम्ही स्वीकारला आहे. तिथे जरी आमची सत्ता आली नाही तरीही आम्ही हिमाचलच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. गुजरातचा दणदणीत विजय दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात साजरा करण्यात आला. त्यावेळी पंतप्रधान […]

Mumbaitak
follow google news

गुजरातमध्ये झालेल्या अभूतपूर्व विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जनतेचे आभार मानले आहेत. एवढंच नाही तर हिमाचल प्रदेशमध्ये जनतेने जो कौल दिला तो आम्ही स्वीकारला आहे. तिथे जरी आमची सत्ता आली नाही तरीही आम्ही हिमाचलच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. गुजरातचा दणदणीत विजय दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात साजरा करण्यात आला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केलं आणि जनतेचे आभार मानले. खासकरून गुजरातच्या युवा वर्गाचेही आभार मानले.

हे वाचलं का?

गुजरातमध्ये मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदी यांनी जनतेने आभार मानले आहे. जनतेच्या आशीर्वादामुळेच हा विजय शक्य झाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच आजच्या विजयातून पुढच्या काळातील चित्र स्पष्ट झाले आहे, असेही ते म्हणाले. दिल्लीतील भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मी आज जनतेसमोर नतमस्तक

मी जनतेसमोर नतमस्तक आहे. जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ आज आपल्याला मिळत आहे. जिथे भाजप जिंकू शकाल नाही, तिथे आपल्या मटणाची टक्केवारी वाढली आहे. मी गुजरात, हिमाचल आणि दिल्लीच्या लोकांचे नम्रपणे आभार व्यक्त करतो.” असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

गुजरातच्या जनतेने विक्रम मोडीत काढला आहेत : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी म्हणाले, गुजरातच्या जनतेने विक्रम मोडीत काढत नवीन विक्रम केला आहे. गुजरातच्या इतिहासातील सर्वात मोठा जनादेश भाजपला देऊन राज्यातील जनतेने नवा इतिहास रचला आहे. तरुण लोक तेव्हाच मतदान करतात जेव्हा त्यांना विश्वास असतो. त्यांना सरकारचे काम दिसले की, ते मतदान करतात. आज तरुणांनी मोठ्या संख्येने भाजपला मतदान केले आहे. तरुणांनी आमच्या कामाला तपासून, त्याची चाचपणी करून विश्वास दाखवला आहे. जात, वर्ग, समाज आणि सर्व प्रकारच्या भेदांच्या वर उठून भाजपला मतदान केले आहे. ते म्हणाले, गुजरातच्या निकालांनी हे सिद्ध केले आहे की विकसित भारताची आकांक्षा सर्वसामान्यांमध्ये किती प्रबळ आहे. देशासमोर आव्हान असताना देशातील जनतेचा भाजपवर विश्वास आहे, हा संदेश स्पष्ट आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की केवळ घोषणेसाठी आम्ही घोषणा करत नाही. त्यामागे दृरदृष्टी असते. भाजपाने अनेक चढउतार बघितले. भाजपाच्या विकासाच्या राजकारणावर देशातील युवकांचा विश्वास आहे. आम्ही जातीपातीच्या आधारे राजकारण करत नाही. त्यामुळे यावेळी आम्हाला ज्या युवा वर्गाने गुजरातमध्ये मतदान केलं त्यांचेही आम्ही विशेष आभार मानतो आहोत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

    follow whatsapp