सत्ताधारी बाकावरील दोन आमदार ‘५० खोके’च्या मुद्द्यावरून आमने-सामने आलेत. आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात राजकीय संघर्ष सुरूये. या वादात शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनीही उडी घेतलीये. रवी राणांनी शब्द मागे घ्यावा, असं म्हणत थेट देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार केलीये.
ADVERTISEMENT
आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातला राजकीय संघर्ष राज्यभरात पोहोचलाय. राणांविरुद्ध बच्चू कडू आक्रमक झालेत. त्यानंतर आता शिंदे गटातले आमदार आणि कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांना राणांना खडेबोल सुनावलेत.
आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी भूमिका मांडलीये. “आमदार रवी राणा यांनी जे वक्तव्य केले आहे ते अत्यंत चुकीचं आहे. एका व्यक्तीवर आरोप म्हणजे सर्वच आमदारांवर आरोप करण्यासारखं आहे. कुणी विकावू नाहीये. तुमच्या एका वादामुळे चाळीस आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही. रवी राणांनी त्यांचे शब्द मागे घ्यावेत”, अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी राणांवर निशाणा साधलाय.
बच्चू कडू आणि रवी राणांमध्ये सुरू झालेल्या वादामागचं खरं कारण काय?
“रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घेतले नाही, तर ही गोष्ट चुकीची होईल आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल. ४० वर्षाचं करियर लावून लोक तुमच्यासोबत मैदानात उतरले आहेत. त्यामुळे रवी राणा यांना आवर घालावा, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांना करतो. तसेच दोघांनाही शांततेनं बसवाव, हीच प्रार्थना आहे”, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणालेत.
आज ही वेळ आली नसती, उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटलांचा टोला
‘सामना’ अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांनी कटुता संपवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं म्हटलं. त्यावरून ठाकरेंनी फडणवीसांना साद घातल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.
‘सरकार किती दिवस चालेल याची सर्वांनाच काळजी’; पृथ्वीराज चव्हाणांचं शिंदे-फडणवीस सरकारबद्दल विधान
गुलाबराव पाटील म्हणाले, “यापूर्वीच अशी साद घातली असती, तर आज ही वेळ आली नसती. ज्यावेळी फाटाफूट झाली, त्यावेळी आम्ही समजण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी ही साद घातली गेली असती, तर आज बासुंदी अन् विष म्हणून कटुता संपवा अशी वेळ आली नसती”, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
ADVERTISEMENT