छत्रपती संभाजीराजे यांनी आक्षेप घेतल्यानंतर ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपट वादात सापडले आहेत. छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेचं समर्थन करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात चित्रपटाचा शो बंद पाडला. यावेळी तिकिटाचे पैसे परत मागणाऱ्या प्रेक्षकांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. शो दरम्यान झालेल्या राड्यानंतर जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ADVERTISEMENT
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या काळातील मावळ्यांच्या आयुष्यावर काढल्या जाणाऱ्या चित्रपटातून इतिहासाशी तथ्यांची तोडमोड केली जात असल्याचा आरोप होतोय. छत्रपती संभाजीराजे यांनी आक्षेप घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशा चित्रपटांविरुद्ध आक्रमक झाले आहे. सोमवारी रात्री (७ नोव्हेंबर) जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहातील हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला.
यावेळी प्रेक्षकांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आल्याचा प्रकारही घडला आहे. या प्रकारावरून आता जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका होऊ लागली आहे.
“राष्ट्रवादीच्या डोक्यातून ‘जात’ अजिबात जात नाही”, शरद पवारांचा उल्लेख, मनसे नेत्यांचं टीकास्त्र
याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या १०० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील वर्तक नगर येथील पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम 141, 143, 146, 149, 323, 504 आणि मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतिहासाचा खेळ करणाऱ्या चित्रपटांना बॉयकॉट करावं : संभाजीराजेंनंतर शिवेंद्रराजेही आक्रमक
परिक्षित विजय धुर्वे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रपट प्रदर्शन करण्यास विरोध, बेकायदेशीर जमाव जमवणे, ‘हर हर महादेव’ चित्रपटचा शो काही वेळासाठी बंद करण्यात आला, प्रेक्षकांना झालेल्या धक्काबुक्की आदी आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यात राडा : जितेंद्र आव्हाडांवर मनसेची टीका
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना धक्काबुक्की आणि मारहाण केल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी टीका केलीये. ‘मराठी प्रेक्षकांना मारहाण करुन बाहेर काढण्याचा अधिकार जितुद्दिन मियांना कोणी दिला आहे? सत्ता गेल्याच्या हतबलतेतून हे सुरू आहे का? सरकारने जितेंद्र आव्हाड व त्यांच्या चमचांवर कारवाई करावी. सिनेमाबद्दल मतभेद एका बाजूला पण ही गुंडगिरी चालणार नाही. सिनेमा पाहायचा की नाही हे लोक ठरवतील’, अशी टीका मनसेचे नेते गजानन काळे यांनी केलीये.
ADVERTISEMENT