Hathras Bhole Baba : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. येथे आयोजित करण्यात आलेला भोले बाबाचा सत्संग 121 जणांच्या जीवावर बेतला. चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांची संख्या 121 वर पोहोचली आहे. याबाबत अनेक नवनवीन अपडेट्स येत आहेत. हा सत्संग बाबा नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा यांचा होता. (hathras stampende case separate vip road female and male guards for security swag of bhole baba)
ADVERTISEMENT
'भोले बाबा' या नावाने त्यांचा सत्संग आयोजित केला जातो. मंगळवारी हा सत्संग हाथरसच्या फुलराई गावात होता. या सत्संगात एटा, कासगंज आणि हाथरस जिल्ह्यांतील तसेच आसपासच्या अनेक जिल्ह्यांतील हजारो लोक उपस्थित होते. या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर अनेक महिला, मुले आणि पुरुषांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण, सत्संगाशी संबंधित एफआयआरमध्ये बाबाचे नाव नाही आहे. आता समोर आलेल्या एका नवीन माहितीनुसार, भोले बाबाने आपल्या सुरक्षेसाठी पुरुष आणि महिला गार्ड नेमले आहेत. या गार्ड्सना नारायणी सेना असे नाव देण्यात आले आहे. हे लोक आश्रमपासून प्रवचन स्थळापर्यंत बाबाची सेवा करतात.
हेही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana : चुका टाळा! 1500 रुपये मिळवण्यासाठी कसा भरायचा अर्ज?
हाथरसच्या 'भोले बाबा'चा भलताच थाट
मिळालेल्या माहितीनुसार, भोले बाबा फक्त सेवकांनाच आपल्या संरक्षणासाठी गार्ड म्हणून ठेवतात. हे लोक एक सारखा ड्रेस कोडही परिधान करतात. भोले बाबाच्या सत्संगात संपूर्ण व्यवस्था स्वयंसेवकांच्या हातात असते. असे सांगण्यात आले की काही शिष्य पोलीस दलातीलही होते. जे जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा प्रवचनाच्या वेळी येत असत. भोले बाबाला प्रवचनस्थळी जाण्यासाठी स्वतंत्र VIP मार्गही तयार करण्यात आला होता. या मार्गावरून फक्त बाबाचा ताफा जाणार होता. त्यांच्याशिवाय कोणालाही तिथून जाण्याची परवानगी नव्हती.
हेही वाचा : Pune News : "पुरुषांनो, कुणी कसेही कपडे घातले तरी...", पुण्यात बघा काय घडलं?
पण आता घडलेल्या भयानक प्रकरणानंतर, नारायण साकार हरी उर्फ 'भोले बाबा' फरार आहे. या प्रकरणी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मुख्य सेवक देवप्रकाश मधुकर आणि इतर सेवकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हाथरस पोलिसांनी सिकंदरराव पोलीस ठाण्यात हा एफआयआर नोंदवला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की कलम 105 (सदोष मनुष्यवध), 110 (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न), 126 (2), 223 (लोकसेवकाने जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा) आणि 238 (पुरावे नष्ट करणे) भारतीय न्याय संहिता आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : Nawab Malik : मलिकांमुळे महायुती कात्रीत, आता भाजप काय करणार?
यादरम्यान, फुलराई गावात घडलेल्या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. सत्संगासाठी व्हीव्हीआयपी व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सत्संगमध्ये अनियमितता झाल्याच्या बातम्या येत आहेत. सत्संगासाठी 80 हजार लोकांची परवानगी मागितली होती, मात्र सुमारे अडीच लाख लोक जमले होते, असे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT