Health Tips : नाश्त्यामध्ये केलेल्या 'या' चुकांमुळे तुमच्या शरिरात वाढते कोलेस्ट्रॉलची पातळी

सकाळी नाश्ता न केल्यानं किंवा चुकीच्या गोष्टी खाल्ल्यानं तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्यानं वाढते. नाश्त्याशी संबंधित अशा काही चुका तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते.

Mumbai Tak

मुंबई तक

27 Dec 2024 (अपडेटेड: 27 Dec 2024, 02:40 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कशामुळे वाढतं तुमच्या शरिरातलं कोलेस्ट्रॉल?

point

नाश्ता करताना या चुका करण टाळा...

सकाळचा नाश्ता हा आपल्या दिवसभरातला सर्वात आरोग्यदायी आहार आहे. नाष्ता करताना केलेल्या चुका आरोग्यावर खूप वाईट परिणाम करतात. हाय-कोलेस्टेरॉल हा एक असा आजार आहे, ज्याचा थेट संबंध तुमच्या नाश्त्याशी आणि खाण्याच्या सवयींशी येतो. एका अभ्यासानुसार, तुम्ही जे काही नाश्त्यात खाता त्याचा थेट परिणाम तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो.

हे वाचलं का?

सकाळी नाश्ता न केल्यानं किंवा चुकीच्या गोष्टी खाल्ल्यानं तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्यानं वाढते. नाश्त्याशी संबंधित अशा काही चुका तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते.

हे ही वाचा >>Dharashiv Sarpanch Attack : मस्साजोगसारखाच हल्ला धाराशिवमध्ये... सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, स्वत: सांगितली आपबीती


नाश्ता : अनेकांना सकाळी नाश्ता करणे आणि थेट दुपारी जेवण करणं आवडत नाही. पण ही एक फार वाईट सवय आहे. कारण असे लोक उपाशीपोटी आरोग्याला चांगल्या नसलेल्या पदार्थांचं सेवन करतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वेगानं वाढते.

साखरयुक्त पदार्थांचे सेवन : अनेक लोक नाश्त्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले कडधान्य खातात. या क़डधान्यांमध्ये साखर आणि कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते जे तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढवते.

प्रक्रिया केलेले पदार्थ : बरेच लोक न्याहारीसाठी सॉस, चिकनसारखे प्रक्रिया केलेले पदार्थ खातात. यामध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते. अशा गोष्टी रोज खाल्ल्यानं कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

हे ही वाचा >>Manmohan Singh death: 'देशाने आपला एक...', पंतप्रधान मोदींनी मनमोहन सिंहांना अशी वाहिली श्रद्धांजली

कार्बोहायड्रेट्सचे सेवन : बरेच लोक नाश्त्यात पास्ता, ब्रेड यासारख्या गोष्टी खातात. यामध्ये फायबरचे प्रमाण नगण्य असतं. कर्बोदकांमधे इन्सुलिनची पातळी झपाट्याने वाढते.

चहा आणि कॉफीचं सेवन : अनेकांना नाश्त्यात साखर असलेली चहा किंवा कॉफी प्यायला आवडते. यामध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं.

फायबर : कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी फायबर अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. नाश्त्यामध्ये ओट्स, फळे आणि भाज्यांचा समावेश करणं महत्त्वाचं आहे.

    follow whatsapp