Monsoon ची मुंबईत दमदार बॅटींग, पाणी साचल्यामुळे अंधेरी सब-वे बंद

मुंबई तक

• 04:46 AM • 12 Jun 2021

मुंबई शहरासह उपनगरातील अनेक भागांमध्ये आज सकाळपासून मुसळधार पावसाने आपली बॅटींग सुरु ठेवली आहे. ९ जून ला शहरात दाखल झालेल्या मान्सूनने पहिल्याच फटक्यात मुंबईची दाणादाण उडवली आहे. पुढचे दोन दिवस शहरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान पाणी साचल्यामुळे अंधेरी सब-वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कुर्ला, सायन, दादर, सांताक्रुझ यासारख्या भागात काल रात्रीपासून मुसळधार […]

Mumbaitak
follow google news

मुंबई शहरासह उपनगरातील अनेक भागांमध्ये आज सकाळपासून मुसळधार पावसाने आपली बॅटींग सुरु ठेवली आहे. ९ जून ला शहरात दाखल झालेल्या मान्सूनने पहिल्याच फटक्यात मुंबईची दाणादाण उडवली आहे. पुढचे दोन दिवस शहरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान पाणी साचल्यामुळे अंधेरी सब-वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

कुर्ला, सायन, दादर, सांताक्रुझ यासारख्या भागात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. दादरच्या हिंदमाता परिसरात पुन्हा एकदा पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी सब-वे मध्ये पाणी जमा झाल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुढचे दोन दिवस शहरात अशाच पद्धतीने मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे महापालिकेच्या सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

Monsoon in Mumbai : ११ दिवसांत शहरात रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद, मुंबईसह कोकण किनारपट्टीला IMD चा अलर्ट

दरम्यान, या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने आपली सर्व यंत्रणा सज्ज ठेवली असून समुद्रकिनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यापासून सर्व आपात्कालीन सोयी-सुवीधा BMC ने सज्ज ठेवल्या आहेत. जाणून घेऊयात दोन दिवसांसाठी मुंबई महापालिकेने शहरात कोणताही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी काय तयारी केली आहे.

१. विभागीय नियंत्रण कक्ष व इतर सर्व नियंत्रण कक्षांना ‘High Alert’ देण्यात आला असून सर्व यंत्रणा सुसज्ज व सतर्क आहे.

२. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सर्व विभागीय नियंत्रण कक्ष हे आवश्यक मनुष्यबळ व साधनसामुग्रीसह सुसज्ज आहेत.

३. पर्जन्य जलवाहिन्या विभागाची ६ उदंचन केंद्रे व विविध ठिकाणी बसविण्यात आलेले पाण्याचा उपसा करणारे उदंचन संच कार्यरत असल्याची खातरजमा करण्यात आली आहे. याकरिता आवश्यक त्या डिझेलची व्यवस्थादेखील स्थानिक उदंचन संच चालकांद्वारे करण्यात आली आहे.

४. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाची पूर व बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात आहेत.

५. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक हे आणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर आहे.

६. भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांच्या समन्वय अधिका-यांना कुलाबा वेधशाळेचा अंदाज सांगण्यात आला असून ते देखील आवश्यकतेनुसार मदतीकरिता तत्पर आहेत.

७. बेस्ट (बीईएसटी) (वाहतूक व विद्युत) आणि अदानी एनर्जी यांना सर्व सबस्टेशन ‘High Alert’ वर ठेवण्याचे आले असून त्यांची मदत पथके सुसज्ज व सतर्क आहेत.

८. मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष व बॅकअप नियंत्रण कक्ष येथे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व कार्यतत्पर आहे.

९. आणीबाणी मदत यंत्रणांपैकी पोलीस, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, बीईएसटी (वाहतूक व विद्युत), शिक्षण खाते, आरोग्य खाते, परिवहन आयुक्त यांचे समन्वय अधिकारी महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षात उपस्थित असणार आहेत.

१०. मिठी नदीच्या पातळीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास क्रांतीनगर व इतर परिसरातील नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतराची व्यवस्था करण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्त, एल विभाग यांना देण्यात आली असून त्वरीत मदतीकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाची एक तुकडी तेथे तैनात करण्यात आली आहे.

११. शिक्षण अधिकारी यांना महापालिकेच्या २४ विभागांमधील तात्पुरते निवारे म्हणून निश्चित करण्यात आलेल्या महापालिका शाळा त्वरि‍त मदतीकरिता सुसज्ज आहेत.

    follow whatsapp