Rain in Satara : अतिवृष्टीचा फटका, महाबळेश्वरमध्ये जमीन १० फूट खचली

मुंबई तक

• 09:41 AM • 23 Jul 2021

एकीकडे कोकणाला मुसळधार पावसाने झोडपून काढलेलं असताना पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांनाही पावसाचा फटका बसला आहे. सातारा जिल्ह्यात अनेक भागांमध्ये अतिवृष्टी होत असून जिल्ह्यातील सर्व धरणांमधून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होताना दिसत आहे. या पावसामुळे महाबळेश्वर भागात जमीन १० फुट खचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सातारा जिल्ह्यात सध्या चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील मिरगाव, […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

एकीकडे कोकणाला मुसळधार पावसाने झोडपून काढलेलं असताना पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांनाही पावसाचा फटका बसला आहे. सातारा जिल्ह्यात अनेक भागांमध्ये अतिवृष्टी होत असून जिल्ह्यातील सर्व धरणांमधून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होताना दिसत आहे. या पावसामुळे महाबळेश्वर भागात जमीन १० फुट खचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

हे वाचलं का?

सातारा जिल्ह्यात सध्या चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबरळी, ढोकावळे या ठिकाणी भूस्खलन झाले आसून, यामध्ये मोठ्या प्रमाणावर जिवित व वित्त हानी झालेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८ व्यक्तींनी आपले प्राण गमावले असून या ठिकाणी एनडीआरएफचे एक पथक आणि स्थानिक प्रशासन, नागरिकांच्यामार्फत युध्दपातळीवर शोध व बचावकार्य चालू आहे.

जावळी तालुक्यातील रेंगडी गावामध्ये दोन व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून बेपत्ता आहेत व दोन व्यक्ती मयत झालेल्या आहेत. तसेच वाई तालुक्यातील कोंढवळे येथील पाच घरं पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्यात दबली गेलेली असून या ठिकाणी दोन व्यक्ती मयत आढळून आलेल्या आहेत. या ढिगाऱ्यात अडकलेल्या २७ नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. मौजे जोर याठिकाणी दोन व्यक्ती मयत आहेत. तसेच महाबळेश्वर तालुक्यामध्ये ५०४.०४ मि.मी इतका विक्रमी पाऊस झाल्यामुळे बऱ्याचशा गावांचा संपर्क तुटला आहे.

Koyna Dam: तुफान पाऊस… कोयना धरणाचे दरवाजे उघडले, 11 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग

सातारा जिल्ह्यातील या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर घरांचे व शेतीपिकांचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. जिल्ह्यात एक अतिरिक्त एनडीआरएफ चे पथक आज सायंकाळपर्यंत दाखल होणार असून यामुळे जिल्ह्यात होणाऱ्या अतिवृष्टीमध्ये तात्काळ शोध व बचावकार्यास मदत होणार आहे.

अतिवृष्टीमुळे नागरिकांनी पुढील प्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनमार्फत करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी पुराच्या पाण्यात प्रवेश करु नये. नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे. मुसळधार पावसासत आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. जुन्या मोडकळीस आलेल्या घरात अथवा इमारतीत आश्रय घेऊ नये. नदी नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असल्यास कोणतही परिस्थितीत पूल ओलांडू नये. अफवांवर विश्वास ठेऊ नये आणि अफवा पररवू नयेत असे, आवाहनही प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

    follow whatsapp