भरघोस पगार, सरकारी नोकरी... IBPS मार्फत 6 हजार जागांसाठी मेगा भरती!

रोहिणी ठोंबरे

03 Jul 2024 (अपडेटेड: 03 Jul 2024, 11:10 AM)

Govt Job : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) मार्फत 6 हजार 128 जागांसाठी मेगा भरती होत आहे. 'लिपिक' पदासाठी ही नोकरीची संधी आहे.

Mumbaitak
follow google news

IBPS Recruitment 2024: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) मार्फत 6 हजार 128 जागांसाठी मेगा भरती होत आहे. 'लिपिक' पदासाठी ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 21 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. या पदासाठीची पूर्व परीक्षा ऑगस्ट 2024 रोजी होईल तर, मुख्य परीक्षा ऑक्टोबर 2024 रोजी असेल. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (high paying salary govt jobs recruitment 2024 for 6 thousand seats through IBPS)

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारे उमेदवार, 

  • कोणत्याही शाखेतून पदवीधर 

  • संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य/ भाषेत प्रमाणपत्र/ डिप्लोमा/ पदवी असणे आवश्यक आहे. हायस्कूल/ कॉलेज/ संस्थामधील एक विषय म्हणून संगणक/ माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केलेला असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Mazi Bahin Ladki Yojana : उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र नाही? मग असा भरा अर्ज

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 850 रूपये शुल्क आकारले जाईल. तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ इएक्सएसएम कॅटेगरीतील उमेदवारांकडून 175 रूपये शुल्क आकारले जाईल.

हेही वाचा : Vidhan Parishad Election : आम्ही तीन जागा निवडून आणणार; राऊतांचे विधान

 

अधिक माहितीसाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनच्या अधिकृत वेबसाइट https://www.ibps.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://ibpsonline.ibps.in/crpcl14jun24/

हेही वाचा : ज्याच्या सत्संगात 100 जणांचा जीव गेला तो भोले बाबा आहे तरी कोण?

 

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1rUiNb6ZouaOl-xpKXccMsoIKQFwnOm3n/view?usp=sharing

    follow whatsapp