पॉर्न चित्रपट निर्मिती आणि पॉर्न अॅप्स प्रकरण गाजत असतानाच मुंबई पोलिसांनी आणखी एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा (High profile sex Racket) पर्दाफाश केला आहे. या सेक्स रॅकेटमध्ये विविध मालिकांमध्ये झळकलेल्या अभिनेत्रीसह एका मॉडेलचं नाव समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
पॉर्न चित्रपट बनवणाऱ्या रॅकेटची चर्चा सुरू असताना मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली. मिळालेल्या माहितीप्रमाणे या सेक्स रॅकेटमध्ये अनेक टीव्ही मालिकांमध्ये भूमिका केलेल्या अभिनेत्रीसह अनेक ब्रॅंडच्या जाहिराती करणाऱ्या मॉडेलचा समावेश आहे.
मुंबई पोलिसांच्या युनिट ७ मधील अधिकाऱ्यांना हायप्रोफाईल सेक्स रॅकेटची माहिती मिळाली होती. ईशा खान नावाची मॉडेल हे रॅकेट चालवत असल्याचं पोलिसांना कळालं. त्यानंतर बुधवारी दुपारी पोलिसांनी जुहूतील एका पंचतारांकित हॉटेलवर धाड टाकली. यावेळी अभिनेत्री आणि मॉडेलला रंगेहाथ पकडण्यात आलं.
पोलिसांनी अभिनेत्री आणि मॉडेलला घटनास्थळावरून निघून जाण्यास सांगितलं. अभिनेत्री व मॉडेलसाठी रॅकेट चालवणाऱ्या ईशा खानने दोन लोकांसोबत दोन तासांसाठी चार लाखांचा व्यवहार केला होता.
या प्रकरणी पोलिसांनी ईशा खानला अटक केली. पोलिसांकडून तिची चौकशी करण्यात आली. अटक केल्यानंतर चौकशीत ईशा खानने सांगितलं की, ती गेली अनेक वर्षांपासून सेक्स रॅकेट चालवत आहे. ती दोन तासांसाठी दोन लाख रुपये घेत असे. यात ५० हजार रुपये तिचं कमिशन असायचं आणि उरलेले दीड लाख रुपये संबंधित मॉडेल आणि अभिनेत्रीला द्यायची.
कोरोनामुळे अडकल्या सेक्स रॅकेटमध्ये…
ईशा खान ग्राहकांशी फोनवर बोलून मॉडेल निश्चित करायची. यासाठी ती त्यांचे फोटो ग्राहकांना पाठवायची. फोटो पाहून निवड झाली की, वेळ आणि ठिकाण ठरवून पंचतारांकित हॉटेलमध्ये रुम बूक केली जायची. पोलिसांनी अभिनेत्री आणि मॉडेलचीही चौकशी केली. कोरोना काळात त्याच्या हातातील शुटिंगचं काम बंद झालं. कुठेच काम मिळत नसल्यानं आर्थिक अडचण निर्माण झाली. त्यानंतर ईशा खानच्या संपर्कात येऊन सेक्स रॅकेटमध्ये सहभागी झाल्याचं अभिनेत्रीने पोलिसांना सांगितलं.
ADVERTISEMENT