James Bond डॅनियल क्रेगची रॉयल नेव्ही कमांडर म्हणून नियुक्ती, डॅनियल म्हणाला…

मुंबई तक

• 04:52 PM • 23 Sep 2021

जेम्स बॉन्ड म्हणून ख्याती असलेला अभिनेता डॅनियल क्रेग याची अमेरिकेच्या रॉयल नेव्हीमध्ये मानद कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्याला हा मान मिळाल्याबद्दल डॅनियल क्रेगने आनंद व्यक्त केला आहे. डॅनियलने ट्विट करून ही माहिती दिली आहे. डॅनियल क्रेगचा नो टाईम टू डाय सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या गुरूवारी म्हणजेच 30 तारखेला रिलिज होणार आहे. या सिनेमाच्या एक […]

Mumbaitak
follow google news

जेम्स बॉन्ड म्हणून ख्याती असलेला अभिनेता डॅनियल क्रेग याची अमेरिकेच्या रॉयल नेव्हीमध्ये मानद कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्याला हा मान मिळाल्याबद्दल डॅनियल क्रेगने आनंद व्यक्त केला आहे. डॅनियलने ट्विट करून ही माहिती दिली आहे. डॅनियल क्रेगचा नो टाईम टू डाय सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या गुरूवारी म्हणजेच 30 तारखेला रिलिज होणार आहे. या सिनेमाच्या एक आठवडा आधीच मिळालेल्या चांगल्या बातमीमुळे आपण खुश आहोत असं डॅनियलने म्हटलं आहे. डॅनियलने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

अधिकृत जेम्स बाँड ट्विटर पेजवर रॉयल नेव्ही गणवेशातील डॅनियल क्रेगचा फोटो शेअर करण्यात आला आहे. सोबत लिहले आहे की, डॅनियल क्रेगला रॉयल नेव्हीमध्ये मानद कमांडर बनवण्यात आले आहे. कमांडर क्रेग म्हणाला ‘वरिष्ठ सेवेत मानद कमांडर पदावर नियुक्त होण्याचा मला खरोखरच विशेषाधिकार आणि सन्मान आहे.’

डॅनियल क्रेग साकारात असलेला जेम्स बाँड या सुप्रसिद्ध अॅक्शन चित्रपट सिरीजमधील 25 वा चित्रपट या महिन्यात भारतीय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नो टाईम टू डाय’ या बाँडपटात डॅनियल क्रेग शेवटचा जेम्स बाँड साकारणार आहे. हा 007 एजंट भारतात 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात क्रेगसोबत रॅमी मालेक, साफीन, राल्फ फिनेस, लिआ सायडोक्स हे कलाकारही दिसणार आहेत.

नो टाईम टू डाय या चित्रपटात लशाना लिंच ही देखील नवी सिक्रेट एजंट नाओमी साकारणर आहे. ती बाँड निवृत्त झाल्यानंतर त्याची जागा घेते. या चित्रपटाच्या नव्या अॅक्शन पॅक्ड ट्रेलरवरून या चित्रपटात जेम्स बाँड आपल्या निवृत्तीतून बाहेर येतो. तो आपल्या सीआयए मधील एका जुन्या मित्राला मदत करतो. त्याचा सामना एका धोकादायक तंत्रज्ञान हातात असलेल्या व्हिलनशी होतो.

या चित्रपटात अकॅडमी पुरस्कार विजेता अभिनेता रॅमी मालेक व्हिलन म्हणून काम करत आहे. त्यामुळे या चित्रपटाची चाहते चातकासारखी वाट पाहत आहे. डॅनियल क्रेगचा हा शेवटचा जेम्स बाँड पट आहे. त्याने आतापर्यंत ताकदीने जेम्स बाँड साकारला आहे. नव्या ट्रेलरवरुन तो चित्रपटात धमाल करण्यासाठी सज्ज असल्याचे जाणवते.

    follow whatsapp