भय इथले संपत नाही! दुकानदाराची नियम फिरली; पेन घेण्यासाठी आलेल्या मुलीवर केला बलात्कार

मुंबई तक

• 08:02 AM • 03 Nov 2021

भय इथले संपत नाही… अशीच काहीशी स्थिती राज्यात महिला सुरक्षिततेबाबत (women safety) झाली आहे. राज्यात लागोपाठ महिला, मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत असून, बीड (beed) जिल्ह्यात अशीच एक भयंकर घटना घडली आहे. एका ऊसतोड कामगाराच्या (sugarcane worker) मुलीवर दुकानदाराने बलात्कार केल्याची संतापजनक प्रकार समोर आला आहे. (Minor girl Raped in beed) 13 वर्षांची पीडित मुलगी पेन […]

Mumbaitak
follow google news

भय इथले संपत नाही… अशीच काहीशी स्थिती राज्यात महिला सुरक्षिततेबाबत (women safety) झाली आहे. राज्यात लागोपाठ महिला, मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत असून, बीड (beed) जिल्ह्यात अशीच एक भयंकर घटना घडली आहे. एका ऊसतोड कामगाराच्या (sugarcane worker) मुलीवर दुकानदाराने बलात्कार केल्याची संतापजनक प्रकार समोर आला आहे. (Minor girl Raped in beed)

हे वाचलं का?

13 वर्षांची पीडित मुलगी पेन आणण्यासाठी दुकानात गेली होती. यावेळी वासनांध झालेल्या दुकानदाराने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

डोंबिवलीत पिंपरी चिंचवडच्या घटनेची पुनरावृत्ती! नरामधम बापाचा 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

काय घडलं?

वडवणी तालुक्यातील एका गावात 13 वर्षीय पीडित मुलीचे आईवडील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाल्याने ऊसतोडीला गेले आहेत. पीडित मुलगी नातेवाईकांकडे राहते. 30 ऑक्टोबर रोजी अल्पवयीन पीडिता गावातील किराणा दुकानात पेन आणण्यासाठी गेली होती. यावेळी दुकानात बसलेल्या 20 वर्षीय नराधमाची नियत ढळली.

पेन घेण्यासाठी आलेल्या पीडितेला आरोपीने चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर दुकानाच्या मागच्या बाजूला घेऊन गेला आणि पीडितेवर अत्याचार केला. या घटनेची माहिती पीडितेनं घरी आल्यानंतर तिच्या काकूला दिली. त्यानंतर तिच्या काकूने घडलेला सर्व प्रकार पीडितेच्या आईवडिलांना सांगितला.

दरोडा… बलात्कार! इगतपुरी ते कसारा स्टेशनच्या दरम्यान पुष्पक एक्स्प्रेसमध्ये काय घडलं?

आईवडिलांनी गावी धाव घेतली. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गणेश गोंडे यांच्यावर पोक्सो, अॅट्रॉसिटी अॅक्ट आणि बलात्काराच्या कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला.

पुण्यात घडली होती लज्जास्पद घटना

काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवडमध्ये बलात्काराची घटना घडली होती. अल्पवयीन मुलीवर तिच्या वडिलांनी बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. बापाने पीडितेच्या दोन भावंडांना बाहेर खेळण्यास पाठवलं.

त्यानंतर तू वयात आली आहे की नाही, असं म्हणून पीडितेवर बलात्कार केला होता. धक्कादायक म्हणजे या कृत्याची कुठेही वाच्यता करून नये म्हणून आरोपीनं मुलीला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली होती. दुपारी झालेला हा सगळा प्रकार शेजारच्यांनी सायंकाळी कामावरून घरी आलेल्या तिच्या आईला सांगितला. त्यानंतर घडलेली घटना ऐकून पीडितेच्या आईला धक्काच बसला.

    follow whatsapp