लातूर : लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या जीप आणि टेम्पोचा भीषण अपघात, सहा जण गंभीर जखमी

मुंबई तक

• 01:42 PM • 21 Nov 2021

निलंगा तालुक्यातील केळगाव ते बुजरूकवाडी मार्गावर टेम्पो व जीपची समोरासमोर जोराची धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत वऱ्हाड घेऊन निघालेल्या जीपमधील सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लातूर – जहीराबाद महामार्गावर केळगाव ते बुजरुकवाडी पाटीच्या दरम्यान निटूरकडे जाण्याच्या दिशेने […]

Mumbaitak
follow google news

निलंगा तालुक्यातील केळगाव ते बुजरूकवाडी मार्गावर टेम्पो व जीपची समोरासमोर जोराची धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत वऱ्हाड घेऊन निघालेल्या जीपमधील सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे वाचलं का?

लातूर – जहीराबाद महामार्गावर केळगाव ते बुजरुकवाडी पाटीच्या दरम्यान निटूरकडे जाण्याच्या दिशेने टेम्पो आणि जीपचा समोरासमोर अपघात झाला. टेम्पो हा सोयाबीनची गुळी घेऊन केळगावच्या दिशेने जात होता. तर उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथून लग्नाचे वर्हाड घेऊन निघाली होती.

या अपघातात जीपचा चुराडा झाला आहे. यामध्ये जीपमधील पाच ते सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ १०८ च्या रूग्णवाहिकेला संपर्क साधून बोलावून घेतले. सर्व जखमीला निलंगा येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. निटुर पोलिस चौकीचे बीट अंमलदार सत्यवान कांबळे व पो. कॉ. हरी कांबळवाड यांनी पंचनामा करून दोन्ही वाहनांना महामार्गाच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

    follow whatsapp