भारतात आणलेल्या चित्त्यांमागचं नागपूरमधलं मराठी कनेक्शन माहित आहे का?

किरण तारे

• 09:51 AM • 22 Sep 2022

मोदी सरकारने १७ सप्टेंबर या दिवशी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशात आठ चित्ते आणले. या चित्त्यांची चर्चा चांगलीच झाली. नामिबियातून हे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात आणण्यात आले. १९४७ नंतर पहिल्यांदाच भारतात चित्ते पाहिले गेले. त्याआधी सुरजगुजाच्या राजाने जे आता छत्तीसगढमध्ये आहे तीन चित्ते शिकारीत मारले होते. मात्र आता जे चित्ते आणले […]

Mumbaitak
follow google news

मोदी सरकारने १७ सप्टेंबर या दिवशी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशात आठ चित्ते आणले. या चित्त्यांची चर्चा चांगलीच झाली. नामिबियातून हे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात आणण्यात आले. १९४७ नंतर पहिल्यांदाच भारतात चित्ते पाहिले गेले. त्याआधी सुरजगुजाच्या राजाने जे आता छत्तीसगढमध्ये आहे तीन चित्ते शिकारीत मारले होते. मात्र आता जे चित्ते आणले गेले आहेत त्यात नागपूरच्या वन्यजीव आणि संवर्धन आणि ग्रामीण विकास संस्थेशी संबंधित असलेल्या डॉ. प्रज्ञा गिरडकर यांचा सिंहाचा वाटा आहे.

हे वाचलं का?

चित्ते नामिबियातून भारतातून आणण्यासाठी कायदेशीर अडथळे दूर झाले ते प्रज्ञा गिरडकर यांच्यामुळेच

चित्ते नामिबियातून भारतात आणण्यासाठी जे काही कायदेशीर अडथळे होते त्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती प्रज्ञा गिरडकर यांनी. Cheetah Conservation Fund (CCF) या जगभरातल्या प्रसिद्ध संस्थेतर्फे प्रज्ञा गिरडकर यांनी चित्ते संवर्धनाचं प्रशिक्षण घेतलं आहे. अशा प्रकारे ट्रेनिंग घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत.

डॉ. प्रज्ञा गिरडकर यांनी जून २०११ मध्ये CCF नामिबियाचे संचालक लॉरी मार्कर यांच्यासोबत काम केलं. त्याच प्रमाणे याच वर्षी त्यांनी चित्त्यांचं संवर्धन कसं करावं याचं प्रशिक्षण घेतलं. भारतात प्रोजेक्ट चिताह हा २००९ मध्ये मांडला गेला होता. डॉ. मार्कर यांनी प्रकल्पासंदर्भातले काही तज्ज्ञ आणि इतर वन्य जीव अभ्यासक यांच्या भेटी भारतात झाले. २०१० ते २०१२ या दोन वर्षांच्या कालावधीत भारतातल्या १० ठिकाणांचं मूल्यांकन आणि अभ्यास केला गेला त्यानंतर शेवटी कुनो नॅशनल पार्क हे चित्त्यांच्या अधिवासासाठी योग्य संभाव्य ठिकाण म्हणून निश्चित करण्यात आलं.

प्रज्ञा गिरडकर यांनी चित्ते संवर्धनाचं ट्रेनिंग घेतलं आहे

चित्त्यांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. प्रज्ञा गिरडकर यांनी दक्षिण आफ्रिकेतील नामिबिया येथे जाऊन ५२ चित्त्यांचा अभ्यास केला. भारतातील नैसर्गिक अधिवासात चित्त्यांना ठेवण्यासाठी त्यांचा स्वभाव, सवयी, आरोग्य आदींचा तपशीलवार अभ्यास आवश्यक होता. त्यासाठी डॉ. गिरडकर नामिबिया येथे जाऊन राहिल्या. सोनेरी ठिपक्यांच्या कातड्यामुळे तसेच संस्थानिकांच्या शिकारीच्या शौकामुळे चित्त्यांची शिकार झाली. १९४७ च्या सुमारास मध्य प्रदेशच्या महाराजाने शेवटच्या तीन चित्त्यांची शिकार केल्यानंतर भारतातील चित्ता नामशेष झाला. भारतात चित्ते येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु २०१२ मध्ये त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्या वेळी सर्वोच्च न्यायालयात विरोधी वकिलाने अचूक माहिती दिली नाही. त्यामुळे भारतात वाघ सुरक्षित नाही तर चित्ते कसे राहतील, असा सवाल करीत परवानगी नाकारण्यात आली होती. चित्ते भारतात आणण्याच्या प्रक्रियेतला तो पहिला अडथळा ठरला.

आपल्या पत्रात डॉ. ओ ब्रायन म्हणतात आशियातील चित्त्यांमध्ये अनुवांशिक फरक असतो पण तो जवळपास नगण्य आहे. अफ्रिकेतील चित्त्यांचा वापर करून भारतात चित्त्यांचं संवर्धन करण्यासाठी कोणतीही खात्रीलायक अशी पार्श्वभूमी नाही. भारतातील कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ते व्यवस्थित टिकून राहू शकतात तसंच शिकारीपासूनही वाचू शकतात असा उल्लेख त्यांनी पत्रात केला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने २०१३ मध्ये वन्यजीव अभ्यासकांची पुनर्विलोकन याचिका मंजूर केली.

CCF संशोधनानुसार आग्नेय आफ्रिकन आणि आशियाई चित्ता 50,000-100,000 वर्षांपूर्वी एकमेकांपासून वेगळे झाल्याचे मानले जाते. डॉ. ओ’ब्रायन अंदाजे 6,500 वर्षांपूर्वी हे दोन चित्ते वेगळे झाले असा अंदाज लावतात. डॉ. गिरडकर म्हणतात की चित्ता हा प्राणी साखळीसाठी अनुकूल आहे. १०० वर्षांपूर्वी त्यांची संख्या विपुल होती. ज्यामध्ये भारतातल्या काही भागांमध्येही चित्ते आढळले होते. चित्ते हे भारतातील हवामानाच्या परिस्थितीत राहण्यास सक्षम आहेत. अफ्रिकेतल्या ज्या भागात चित्ते आढळतात तिथे दिवसाचं तापमान खूप उष्ण आणि रात्री खूप थंड होऊ शकतं. या अशा हवामानातही चित्ते राहू शकतात. वातावरणातल्या बदलांशी ते जुळवून घेतात.

ख्यातनाम आॅस्ट्रेलियन चित्तातज्ज्ञ लाॅरी मार्कर यांनी नामिबियातील चित्त्यांच्या वसाहतीसारखेच वातावरण भारतात असल्याचे स्पष्ट केले आहे. येथील गवताळ प्रदेशात चित्ता आरामात राहू शकतो. मध्य प्रदेशातील कुणोलपूर, नौरदोही अभयारण्य तसेच राजस्थानातील जैसलमेरजवळील शहागड येथील गवताळ प्रदेश चित्त्यांच्या अधिवासासाठी उपयुक्त असल्याने चित्त्याला भारतात परत आणण्याचे प्रयत्न झाले.

डॉ. गिरडकर यांनी हेदेखील स्पष्ट केलं आहे की भारताप्रमाणेच चित्ते अफ्रिकेतही अतिवृष्टीचा सामना करतात. तसंच गवताळ प्रदेशातही ते व्यवस्थित राहतात. शिकार करण्यासाठी अशाच प्रकारच्या प्रदेशाचा उपयोग करतात. उंच गवत असेल किंवा जास्त झुडपं असतील तर त्या ठिकाणी राहणं चित्ते पसंत करतात.

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क मध्ये CCF च्या टीमने व्हिजिट केली होती. त्यांनी इथल्या फिल्ड ऑफिसर्सना प्रशिक्षण दिलं होतं. चित्त्यांचं संवर्धन कसं करावं याची माहिती त्यांना देण्यात आली. तसंच कुनो नॅशनल पार्कचे कर्मचारी प्रोजेक्ट चितासाठी प्रयत्न करत होते. डॉ. गिरडकर म्हणतात की भारतात शाश्वत पर्यटनाला चालना दिली गेली पाहिजे. या प्रकल्पासाठी उत्साही रेंजर्स, संशोधक आणि पशुवैद्यकांची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य प्रशिक्षणाद्वारे, या व्यक्ती भारतातील चित्ता तज्ञ बनतील आणि प्रकल्पाच्या यशासाठी केंद्रस्थानी असतील असंही गिरडकर यांनी म्हटलं होतं.

कुनो नॅशनल पार्कमध्ये सध्याच्या घडीला २१ चित्ते राहू शकतात. कुनो वन्यजीव अभयारण १२८० स्वेअर किमीमध्ये पसरललं आहे. यामध्ये संपूर्ण विस्तीर्ण परिसरात ३६ चित्ते राहू शकतात. सध्या भारतात ८ चित्ते आणण्यात आले आहेत. तर जगभरात सध्या ७ हजार १०० पेक्षाही कमी चित्ते शिल्लक राहिले आहेत.

    follow whatsapp