बॉलिवूडमधली सुप्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. २१५ कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात जॅकलिनला आरोपी करण्यात आलं आहे. ईडीने जॅकलिनच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. तिलाही वसुलीच्या रकमेचा फायदा झाला असा दावा ईडीने आरोपपत्रात केला आहे. सुकेश चंद्रशेखर हा गुन्हेगार असल्याचं तिला माहित होतं तरीही तिने त्याच्याकडून महागड्या भेटी घेतल्या असंही यात म्हणण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
पर्शियन मांजरी, 52 लाखांचा घोडा आणि…; ‘जॅकलिन’वर महागड्या भेटवस्तूंची उधळण
या सगळ्या प्रकरणानंतर जॅकलिनने इंस्टाग्रामवर लिहिली पोस्ट
जॅकलिन या पोस्टमध्ये म्हणते, प्रिय मी(स्वतःला उद्देशून) जगातल्या सगळया चांगल्या गोष्टींसाठी मी पात्र आहे. मी खंबीर आहे. स्वतःला मी स्वीकारलं आहे. लवकरच सर्व काही ठीक होईल हा विश्वास आहे. मी माझी स्वप्नं पूर्ण करेन, मी सगळं काही करू शकते. या आशयाची पोस्ट जॅकलिनने स्वतःला उद्देशून लिहिली आहे.
जॅकलिनच्या आयुष्यात सुकेश कसा आला?
डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनसोबत संपर्क करण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र जॅकलीनने त्याला भाव दिला नाही. त्यानंतर सुकेश चंद्रशेखरने डोकं लावलं. त्याने गृहमंत्री अमित शाह यांच्या ऑफिसमधला नंबर घेऊन त्याने जॅकलिनच्या एका निकटवर्तीयाशी संपर्क साधला. त्या मार्गे त्याने जॅकलिनच्या संपर्कात येण्याचा पर्याय निवडला.
जॅकलिनसचा मेकअप आर्टिस्ट शान मुत्ताथिलला त्याने संपर्क साधला होता. जॅकलिनचं इंस्टाग्राम पेज पाहिलं तर शान आणि तिची चांगली दोस्ती आहे हे लक्षात येतं. शानने एक चांगला मित्र म्हणून जॅकलिनला सांगितलं की त्याला एका व्हिआयपी नंबरवरून फोन आला होता. त्या नंबरवरून ज्याने फोन केला होता त्या कॉलरला तुझ्याशी बोलायचं आहे.
सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन यांच्यातली जवळीक दाखवणारा ‘हा’ फोटो तुफान व्हायरल
हा कॉल व्हीआयपी नंबरवरून आला होता. या फोनवरवरून बोलणाऱ्याने त्याचं नाव शेखर रत्न वेला असं सांगितलं होतं आणि सरकारी कार्यालयातून बोलत आहोत असंही सांगितलं होतं. हा शेखर रत्न वेला म्हणजे दुसरा तिसार कुणी नसून सुकेश चंद्रशेखरच होता.
यानंतर जॅकलिन आणि शेखर (सुकेश) यांच्यात बोलणं सुरू झालं. त्यानंतर हे बोलणं वाढलं. या बोलण्यातून सुकेशने जॅकलिनला किती थापा मारल्या माहित नाही. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्याशी माझं नातं आहे अशी थाप सुकेशने मारली होती. त्यानंतर मी सन टीव्हीचा मालक आहे असंही त्याने जॅकलिनला सांगितलं होतं. मात्र त्याने या सगळ्या थापा मारल्या होत्या.
जॅकलिन फर्नांडिसला सुकेश राजकुमारीसारखं वागवत होता
जॅकलिन आणि शेखऱ उर्फ सुकेश चंद्रशेखर जवळ येत गेले तसे तो जॅकलिनला अनेक महागडी गिफ्ट देऊ लागला. या भेटींची किंमत कोट्यवधी रूपये होते. सुकेशने आत्तापर्यंत जॅकलिनला सात कोटी रूपयांची गिफ्ट दिली आहेत असा अंदाज वर्तवला जातो आहे.
या भेटवस्तूंमध्ये बिर्किन बॅग, Chanel, Gucci, YSL या ब्रांडचे कपडे, हर्मीस ब्रांडच्या बांगड्या, टिफनी ब्रांडचं ब्रेसलेट, अंगठ्या, झुमके यांचा समावेश आहे. एवढंच नाही तर रोलेक्स, रोजर डुबईस, फ्रेंक मुलर या ब्रांडची घड्याळं देऊनही जॅकलिनचं मन जिंकण्याचा प्रयत्न सुकेशने केला. फक्त जॅकलिनलाच नाही तर तिच्या कुटुंबीयांनाही गिफ्ट देण्यात आली. तिच्या आईला एक पोर्श आणि मासेराती कार सुकेशने भेट म्ङणून दिली. जॅकलिनने मात्र आपल्या कुटुंबीयांनी गिफ्ट घेतली नसल्याचं म्हटलं आहे.
सुकेश एवढा श्रीमंत कसा झाला?
जर एखादी व्यक्ती जन्माने श्रीमंत नसेल तर ती व्यक्ती श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करते. अनेक आडमार्गाचे प्रयत्न सुकेशनेही केले त्यामुळेच त्याला अटक झाली. सुकेशला अटक झाली पण तो काही साधासुधा कैदी नव्हता. तुरुंगात त्याने आपलं साम्राज्य उभं केलं. खंडणी वसुलीचं काम सुकेश तुरुंगात राहून करत होता. इथे एंट्री होते ती रॅनबॅक्सीचा माजी प्रमोटर शिविंदर सिंह याची. शिविंदर फसवणूक प्रकरणात आणि इतर प्रकरणांमध्ये तुरुंगात असल्याचं कळलं.
शिविंदरला तुरुंगातून बाहेर पडायचं होतं आणि त्याच्या पत्नीला लवकर त्याला घरी आलेलं बघायचं होतं. याचाच फायदा सुकेश चंद्रशेखरने उचलला. सुकेशने 15 जूनला शिविंदरच्या पत्नीला म्हणजेच आदिती सिंहला फोन केला. त्यावेळी मी सरकारी अधिकारी बोलत असल्याचं त्याने सांगितलं. तसंच आदिती सिंहला तो हे पटवून देत होता की मी शिविंदरला तुरुंगातून बाहेर काढू शकतो.
सुकेश व्हॉईस मोड्युलेशन सॉफ्टवेअरचा उपयोग करून स्वतःला कधी कायदेशीर सचिव तर कधी गृह सचिव असल्याचं सांगत होता. एवढंच नाही तर कधीकधी मी गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयाचा प्रतिनिधी बोलतो आहे असंही सांगत होता. आदिती सिंहला तो या नावांनी फोन करत होता. त्याने एक दिवस आदितीकडे पैशांची मागणी केली. पक्षासाठी ही देणगी तुम्हाला द्यायची आहे असं सुकेशने आदितीला सांगितलं. आदितीकडून सुकेशने या बहाण्याने कोट्यवधी रूपये घेतले.
आदितीला वाटलं की तिचा नवरा तुरुंगाबाहेर येईल. त्यानंतर आपला व्यवसाय परत मार्गावर येईल असंही तिला वाटत होतं. मात्र एकटा सुकेशच होता ज्याचा वसुलीचा व्यवसाय तेजीत सुरू होता. ईडीला संशय आहे की सुकेशने आदितीकडून 200 कोटी रूपये वसूल केले असावेत.
ईडीने दिली महागड्या भेटवस्तूंची यादी…
चंद्रशेखरने जॅकलिनला अनेक महागड्या वस्तू आणि प्राणी भेट म्हणून दिल्याचं ईडीने आरोपपत्रात सांगितलं होतं. ज्वेलरी, हिरेजडीत ज्वेलरीचे सेट, क्रॉकरी, चार पर्शियन जातीच्या मांजरी (एका मांजरीची किंमत जवळपास 9 लाख रुपये आहे.) आणि 52 लाख रुपये किंमतीचा घोड्यासह अनेक महागड्या वस्तू भेट दिल्याचं ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलं होतं.
ADVERTISEMENT