मुंबई: तौकताई चक्रीवादळाने (Tauktae Cyclone) देशाच्या किनारपट्टी राज्यांमध्ये प्रचंड धुमाकूळ घातला. ज्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अब्जावधी रुपयांचं नुकसान देखील झालं आहे. या वादळामुळे समुद्राच्या आत एक मोठा अपघात झाला. नवरत्न कंपन्यांमधील तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (ONGC) तेल विहिरींवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही याचा फटका बसला.
ADVERTISEMENT
या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोक मृत्यूच्या दाढेत कसे अडकले होते हेच या व्हीडिओमधून पाहायला मिळत आहे.
या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या लोकांना तात्काळ वाचविण्यात आलं. दरम्यान, Barge P305 या अपघातात तब्बल 86 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर 188 जणांना वाचविण्यात आलं आहे. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
दरम्यान, तेल विहिरींवर काम करणे खरोखरच धोकादायक आहे काय? तिथे काम करणारे लोक आपले प्राण धोक्यात टाकून काम करतात का? तेलांच्या विहिरींच्यावर तयार केलेल्या प्लॅटफॉर्मवर नेमकं कसं काम केलं जातं? चला जाणून घेऊया याविषयी सविस्तरपणे.
70 वर्षात असं कधीही घडलं नव्हतं, मुंबईतील चक्रीवादळाचा नेमका इतिहास काय?
सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात अपघाताविषयी:
17 मे रोजी तौकताई वादळाने अरबी समुद्रात जोर पकडला. तेव्हा ओएनजीसी तेल विहिरींवर काम करणारे लोकही त्याच्या तावडीत सापडले. वेगवेगळ्या बार्ज आणि बोटींवर यावेळी अंदाजे 800 हून अधिक लोक होते. त्यावेळी तिथे हवेचा वेग सुमारे ताशी 200 किमी एवढा प्रचंड होता. तर समुद्रात 30 फूट उंच लाटा उसळत होत्या. अशा प्रसंगी भारतीय नौदलाने धाडसी बचाव मोहीम राबविले. जोरदार वारे आणि उचं लाटा यांच्यादरम्यान नौदलाच्या हेलिकॉप्टरनेही उड्डाण केले. लोकांना सुरक्षित ठिकाणी नेले. पण यात आतापर्यंत 80 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा देशातील समुद्राच्या आत घडलेला सर्वात मोठा अपघात आहे. या सर्वात प्रश्न असा निर्माण होतो की, तेल विहिरीवर एवढ्या प्रमाणात लोकं काय काम करतात?
तेल विहिरींची सिस्टम समजून घ्या
समुद्राच्या तळापासून तेल काढण्याचे काम जगभर केले जाते. हे तांत्रिकदृष्ट्या कठीण काम आहे. तेल विहिरींमधून तेल काढण्याची सिस्टम समजण्यापूर्वी या विहिरीचे काही भाग समजून घ्यावे लागतील. सर्व प्रथम हे जाणून घ्या की, तेल विहिरी पूर्णपणे समुद्रावर फ्लोटिंग स्ट्रक्चर आहेत. म्हणजे, जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा सर्वकाही किनाऱ्यावर आणले जाऊ शकते. खरं तर तेल विहिरींवर वर्षांनुवर्षे काम करता सुरु असतं. मूलतः तेलाच्या विहिरींमध्ये दोन प्रकारच्या रचना असतात. एक तेल काढण्यासाठी ड्रिलिंग केलं जातं. दुसरा तो जिथे काम करणारे लोक राहतात. ज्याला ओएनजीसीच्या तेल विहिरी म्हणून मानलं जातं.
-
त्याचा एक भाग म्हणजे सागर भूषण तेल रिग. म्हणजेच असा भाग जिथे विहिरीतून तेल काढलं जातं. येथे ड्रिलिंग केले जाते. इथे कच्च तेलं काढून ते प्रक्रियेसाठी पुढे पाठविले जाते. हेच तेल ऑईल रिफायनरीमध्ये पोहचल्यावर तुम्हा-आम्हाला डिझेल-पेट्रोलच्या स्वरूपात उपलब्ध होतं.
-
दुसरा भाग म्हणजे बार्ज पी 305, कार्गो बार्ज जीएएल कन्स्ट्रक्टर, बार्ज एसएस -3 आहेत. या भागात बार्ज पी 305 आणि बार्ज एसएस -3 वर लोकं राहतात. कार्गो बार्ज हे मालवाहतुकीसाठी असतं. याचा अर्थ असा की कच्चे तेल किनाऱ्यावर आणणे किंवा तेलाच्या विहिरींसाठी लागणारी अवजड यंत्रसामग्रीची वाहतूक करणे अशी कामे याद्वारे केली जाते.
बेफाम लाटा, बेलगाम वारा… तरीही बहाद्दरांनी वाचवले शेकडो जीव; समुद्रातील थराराची कहाणी
या संपूर्ण कामासाठी 800 लोकांना कामावर ठेवण्यात आलं आहे. तेल विहिरींमध्ये काम करण्याच्या पद्धती समजून घेण्यासाठी आम्ही ओएनजीसी विहिरींमध्ये काम केलेल्या अधिकाऱ्यांशी बोललो. नाव न सांगण्याच्या अटीवर त्याने याबद्दल सविस्तर माहिती दिली.
ऑफशोर आणि ऑनशोर नेमका फरक काय?
कोणत्याही तेल काढणार्या कंपनीत दोन प्रकारचे लोक काम करतात. एक ऑनशोर आणि दुसरे ऑफशोर. ऑनशोर म्हणजे समुद्राच्या काठी राहून काम करणारे लोकं. तर ऑफशोर म्हणजे थेट खोल समुद्रात जाऊन काम करणारे लोकं. कंपनी आपल्या कोणत्याही इंजिनिअरला ऑनशोर किंवा ऑफशोरवर काम करण्यासाठी पाठवू शकते. आपण आपल्या मर्जीने ड्यूटी मागू शकत नाहीत.
दोघांमध्ये काय फरक आहे?
ऑनशोर काम करणाऱ्यांना बहुधा ऑफिसमध्ये काम करावे लागते. तथापि लोडिंग, अनलोडिंग सारखी बरीच कामे आहेत जी ऑफिसबाहेर देखील असतात. या व्यतिरिक्त व्यवस्थापन व संशोधन व विकास इत्यादी महत्वाची कामेही केली जातात. ऑफशोर कामगार तेलाच्या विहिरींवर ड्रिलिंग ते तेल प्रोसेसिंगपर्यंत अनेक कामं करतात. हे लोकं काम पूर्ण होईपर्यंत तेलाच्या विहिरींवरच राहत असतात.
Tauktae Cyclone चा फटका बसलेलं Barge P 305 सापडलं
विशिष्ट प्रकारचे इंजिनिअरच तेलाच्या विहिरींमध्ये काम करतात?
तसं नाही. ओएनजीसीसारख्या कंपनीत प्रत्येक ट्रेडचे इंजिनिअर तेल विहिरींवर काम करतात. त्यांची संख्या कमी-जास्त असू शकते. उदाहरणार्थ, कम्प्युटर आणि आयटी इंजिनिअर कमी असतात. इथे मॅकेनिकल आणि केमिकल इंजिनिअरची संख्या जास्त असते. याशिवाय मॅनेजमेंटमधील देखील काही लोकं हे ऑफशोअर ड्युटीवरही पाठविले जातात.
तेलाच्या विहिरीवर एक माणूस किती दिवस राहतो?
प्रत्येक तेल कंपनीची काम करण्याची सिस्टम ही वेगळी असते. परंतु प्रत्येक ऑफशोर ठिकाणी ऑन-ऑफ ड्यूटीची व्यवस्था आहे. ऑन-ऑफ ड्यूटी म्हणजे अर्धा महिना काम आणि अर्धा महिना सुट्टी. जर आपण ओएनजीसीबद्दल बोललो तर, तेथे चालू असलेल्या कामाच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे 14 दिवस 14 दिवस काम करा आणि 14 दिवस घरी राहा. दुसरं आहे 21 दिवसांचा ऑन-ऑफ. तेथे 21 दिवस काम आणि 21 दिवस रजा. ऑफशोअर असलेल्या दिवसांमध्ये आपल्याला सुट्टी मिळत नाही.
लोक तेल विहिरींवर काम करण्यासाठी कसे जातात?
कर्मचार्यांना त्यांच्या घरापासून तेल विहिरींपर्यंत नेण्याची पूर्ण जबाबदारी ही ONGC ची आहे. समजा ऑफशोअरमध्ये काम करणारा एखादा कर्मचारी दिल्लीत राहतो आणि जर त्याला अरबी समुद्रात असलेल्या तेल विहिरीवर काम करण्यासाठी पाठवायचे असे तर कंपनी प्रथम कर्मचार्याला दिल्लीहून मुंबईला बोलवते. त्यानंतर ते कर्मचाऱ्याला मुंबईहून हेलिकॉप्टरने तेलाच्या विहिरीजवळ सोडतं. हा संपूर्ण खर्च कंपनीचा असतो.
Mumbai Rains: मुंबईतील पावसाचा धडकी भरवणारा VIDEO, तौकताई चक्रीवादळाचा प्रकोप
तिथे राहण्याची, खाण्या-पिण्याची काय व्यवस्था आहे?
कंपनी ऑफशोरमध्ये राहणाऱ्या कर्मचार्यांसाठी एक लहान फ्लोटिंग शहर स्थापित करतं. दुर्घटनाग्रस्त बार्ज पी 305 आणि बार्ज एसएस -3 हे देखील अशाच प्रकारचे फ्लोटिंग शहरं होती. त्यामध्ये राहण्यासाठी दुहेरी आणि तिहेरी बंक बेड्सची सोय होती. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांना सिंगल बेड देण्यात येतात. जी लोकं तेल विहिरींवर काम करणारे असतात ते येथेच राहतात. खाण्या-पिण्याचे सगळं सामान त्यांना किनाऱ्यावरुन पोहचवलं जात असतं. ऑफशोरमध्ये काम करणारे कर्मचारी सांगतात की, तेथे खाण्या-पिण्याची काहीच अडचण नसते. पण स्वयंपाकघरात शिजलेले भोजन तिथे मिळत नाही. तिथे फक्त फ्रोजन फूड मिळतं. येथे करमणुकीसाठी टीव्ही रूम आहेत. तसेच चेस, कॅरम, लुडो असे खेळ खेळण्याची देखील सोय असते. बार्जवर जिमची देखील व्यवस्था असते. कर्मचारी दिवस आणि रात्र अशा दोन शिफ्टमध्ये काम करतात.
इंटरनेट, मोबाईल, लॅपटॉप इत्यादी घेऊन जाण्यास परवानगी असते?
ONGC ऑफसाइट किंवा तेल विहिरींवर काम करणारे मोबाइल फोन घेऊन जाऊ शकत नाहीत. खासगी कंपन्यादेखील अशी परवानगी देत नाहीत. तेल विहिरींवरील काम हे फार गुप्ततेने केले जाते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कंपन्या व्हीडिओ वगैरे शूट करण्यास परवानगी देत नाहीत. लॅपटॉप, कम्प्युटर असतात परंतु इंटरनेटची मर्यादित सुविधा आहे. कंपनीकडे इंट्रानेट असतं. यावर मर्यादित वेबसाइट चालतात. सोशल मीडिया साइट चालत नाहीत.
Tauktae Cyclone: तौकताई चक्रीवादळाचा रुद्रावतार, समुद्र प्रचंड खवळला
तेल विहिरींवर काम करण्यासाठी विशिष्ट प्रशिक्षण दिलं जातं?
ऑफशोअरमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचार्यास एक विशेष प्रशिक्षण दिले जाते. सरकारी तेल कंपन्या या आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतातच पण खासगी कंपन्या काही एजन्सीद्वारे आपल्या कर्मचार्यांना प्रशिक्षण देतात. कर्मचार्यांना दोन प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. पहिलं ट्रेनिंग असतं ते म्हणजे हेलिकॉप्टरला अपघात झाल्यास त्यातून नेमकं बाहेर कसं पडायचं याचं. तर दुसरं ट्रेनिंग असतं ते म्हणजे पाण्यात राहून स्वत:चा बचाव कसा करायचा याचं. याचा अर्थ असा की आपण पाण्यात पडल्यास आपली मदत येईपर्यंत आपले संरक्षण कसे करावे याचे. हे मूलभूत प्रशिक्षण आहे. याशिवाय ऑफशोअर कामगार सतत वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिल करतात.
तेल विहिरींवर काम करणाऱ्यांचा पगार जास्त असतो?
ओएनजीसीमध्ये काम करणाऱ्या ऑफशोर कर्मचार्यांना ऑनशोर किंवा किनाऱ्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा 40 टक्के अधिक पगार मिळतो. जर एखादा कर्मचारी तेलाच्या विहिरींवर असताना 8 तासांपेक्षा जास्त काळ काम करत असेल तर त्याला ओव्हरटाईम देखील दिला जातो. हीच व्यवस्था खासगी कंपन्यांमध्येही असते.
ADVERTISEMENT