राज्यसभा निवडणूक 2022 : महाविकास आघाडी की भाजप… कुणाकडे आहे जास्त संख्याबळ?

मुंबई तक

• 07:06 AM • 31 May 2022

राज्यातील राजकीय वातावरण राज्यसभा निवडणुकीने ढवळून निघालं आहे. शिवसेनेपाठोपाठ भाजपनंही सहाव्या जागेसाठी उमेदवार दिल्यानं आता चुरस वाढली आहे. दोन्ही बाजूंनी सहावी जागा जिंकण्याचे दावे केले जात असून, आकड्यांची जुळवा जुळव सुरू झाली आहे. राज्यसभा निवडणूक १० जून रोजी होणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातलं वातावरण तापलं आहे. भाजपतर्फे पियूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक […]

Mumbaitak
follow google news

राज्यातील राजकीय वातावरण राज्यसभा निवडणुकीने ढवळून निघालं आहे. शिवसेनेपाठोपाठ भाजपनंही सहाव्या जागेसाठी उमेदवार दिल्यानं आता चुरस वाढली आहे. दोन्ही बाजूंनी सहावी जागा जिंकण्याचे दावे केले जात असून, आकड्यांची जुळवा जुळव सुरू झाली आहे.

हे वाचलं का?

राज्यसभा निवडणूक १० जून रोजी होणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातलं वातावरण तापलं आहे. भाजपतर्फे पियूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरले आहेत. राज्यसभा निवडणुकीत आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फए प्रफुल पटेल यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसने इम्रान प्रतापगढींना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेने संजय राऊत आणि संजय पवार या दोघांना उमेदवारी दिली आहे.

महाविकास आघाडीचं संख्याबळ किती? (२०१९)

शिवसेना ५५ (१३ मतं), राष्ट्रवादी ५३ (११ मतं), काँग्रेस ४४ (०२ मतं)

एकत्र १५२ (२६ मतं)

४२ मतं सोडून महाविकास आघाडीकडे २६ मतं उरत आहेत हे दिसतं आहे. महाविकास आघाडीचं अधिकृत संख्याबळ १६९ इतकं होतं.

अपक्ष कुणाच्या बाजूने?

भाजपचे सहकारी पक्ष- शेकाप-१, रासप-१ आणि जनसुराज्य एक

शिवसेनेला पाठिंबा देणारे अपक्ष कोण?

प्रहार जनशक्ती पक्ष-२

सपा-२

स्वाभिमानी-१

क्रांतिकारी शेतकरी पक्ष-१

बहुजन विकास आघाडी-३

२०१९ ला अधांतरी कोण राहिलं?

मनसे १

माकप-१

एमआयएम २

भाजपकडे असलेल्या अपक्षांचा विचार केला तर ते कोण आहेत हे जाणून घेऊ

प्रकाश आवाडे

रवी राणा

राजेंद्र राऊत

महेश बालदी

शिवसेनेला पाठिंबा देणारे अपक्ष कोण?

राजेंद्र यड्रावरकर

चंद्रकांत पाटील

मंजुळा गावित

नरेंद्र बोडेकर

आशिष जैस्वाल

संजय शिंदे

तळ्यात मळ्यात असलेले तीन अपक्ष कोण?

किशोर जोरगेवार

विनोद अग्रवाल

गीता जैन

सध्याच्या घडीला विचार केला तर २६ मतं महाविकास आघाडीकडे आहेत. याचाच अर्थ राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पारडं जड राहणार आहे.

    follow whatsapp