हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात घरगुती वादातून पतीने आपल्या पत्नीची गळा चिरुन हत्या केली आहे. पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. श्रावण गंगाधर चौरे असं या आरोपीचं नाव आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रावण आणि त्याची पत्नी पार्वतीबाई यांचे गेल्या काही दिवसांपासून सतत वाद होत होते. किरकोळ कारणावरुन दोघांमध्ये सतत वाद रंगायचे. आज सकाळीही दोघांमध्ये वाद झाल्यानंतर पार्वतीबाई या शेतावर कामासाठी निघून गेल्या. या पाठोपाठ श्रावण रागाच्या भरात कोयता घेऊन शेतावर दाखल झाला.
बाईकवरुन जाणाऱ्या जोडप्याला थांबवत आरोपींकडून पतीला मारहाण, पत्नीवर बलात्कार
याच रागाच्या भरात श्रावणने आपल्या पत्नीवर कोयत्याने वार करत तिचा गळा चिरला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पार्वतीबाई जोरात ओरडल्या. हरभरा गोळा करायचं काम करत असलेल्या पार्वतीबाईंच्या सासू-सासऱ्यांनी हा प्रकार पाहतात तात्काळ धाव घेतली, परंतू तोपर्यंत श्रावण फरार झाला होता. वसमत ग्रामीण पोलिसांनी या घटनेची दखल घेत, पार्वतीबाईंचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथकं पाठवली आहेत.
ADVERTISEMENT