सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका सुनावणीत एका महिला याचिकाकर्त्याला चांगलंच फटकारलं आहे. बलात्कार प्रकरणात, याचिकाकर्त्या महिलेने आरोप केलेल्या व्यक्तीला मिळालेला जामीन रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तुमचा नवरा सीमेवर असताना तुम्ही परपुरुषासोबत हॉटेलमध्ये गेलात, हे नातं सहमतीचं असल्याचं दिसत आहे असं सांगत न्यायालयाने याचिकाकर्त्या महिलेची मागणी फेटाळून लावली आहे.
ADVERTISEMENT
जस्टीस डी.वाय.चंद्रचूड आणि जस्टीस सूर्यकांत यांनी राजस्थान उच्च न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केल्यानंतर या प्रकरणात कोणताही वेगळ्या प्रकारचा निर्णय देण्यास नकार दर्शवला आहे. “तुम्ही तुमच्या मुलांना घरी ठेवून आरोपीसोबत हॉटेलमध्ये गेलात. तुम्ही आरोपीसोबत राहता यावं म्हणून जवळच भाड्याने एक खोली घेतलीत. तुमचा नवरा जो इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीसमध्ये कार्यरत आहे, त्याचा पगार तुम्ही अशा पद्धतीने खर्च करत होतात. त्या बिचाऱ्या गरीब जवानाला तो सीमेवर असताना त्याची पत्नी इथे काय करतेय हे माहिती नसेल”, असं परखड मत जस्टीस सूर्यकांत यांनी व्यक्त केलं.
जस्टीस चंद्रचूड यांनी दाखल झालेल्या चार्जशीटचा आधार घेत, याचिकाकर्ती महिला आणि आरोपीमधलं नातं हे सहमतीचं असल्यामुळे राजस्थान उच्च न्यायालयाचा निर्णय बदलण्यास नकार दिला. आदित्य जैन यांनी याचिकाकर्त्या महिलेची बाजू कोर्टासमोर मांडली. ज्यात त्यांनी आरोपीने महिलेचा छळ करुन तिच्यावर बलात्कार केला आणि तिला पैशासाठी वारंवार ब्लॅकमेल केल्याचं सांगितलं. याचिकाकर्ती महिला आणि आरोपीमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारांचा दाखला यावेळी जैन यांनी मांडला. राजस्थान हायकोर्टाने ही बाब निर्णय सुनावताना लक्षात घेतली नसल्याचंही जैन यांनी कोर्टासमोर सांगितलं.
पिंपरी: लॉजवर सुरु होता वेश्याव्यवसाय, अभिनेत्रीसह तीन महिलांची पोलिसांनी केली सुटका
याचिकाकर्ती महिला ही आपल्या पती आणि दोन मुलांसह राजस्थानजवळ राहते. तिचा पती हा जम्मूमध्ये ITBP मध्ये कार्यरत आहे. या महिलेने आपल्या तक्रारीत आपल्याच नात्यातील एका महिलेने तिला घरी बोलावलं होतं असं सांगितलं. यावेळी सदर आरोपी तिकडे हजर होता. यावेळी या महिलेला चहा देण्यात आला होता, ज्यानंतर तिची शुद्ध हरपली.
काहीकाळानंतर या महिलेला जाग आल्यानंतर तिला आपल्यावर बलात्कार झाल्याचं लक्षात आलं. इतकच नव्हे तर आरोपीने आपल्यावर बलात्कार करतानाचे फोटो आणि व्हिडीओही शूट केल्याची तक्रार याचिकाकर्त्या महिलेने केली आहे. आरोपीने आपल्याला याबद्दल कोणालाही सांगितलं तर हे सर्व व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. परंतू सर्वोच्च न्यायालयासमोर हा युक्तीवाद तोकडा पडल्यामुळे आरोपीचा जामीन अर्ज रद्द करण्यात न्यायालयाने नकार दिला आहे.
‘ती’ हत्या घरगुती वादातून नाही! बायको आणि मुलीचं प्रेमप्रकरण समजल्यामुळे वडिलांनी गमावला जीव
ADVERTISEMENT