नागपूरच्या चंद्रमणी भागात आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने I Love you death अशी चिठ्ठी लिहून ठेवत आत्महत्या केली आहे. मंगळवारी दुपारी दीड वाजल्याच्या दरम्यान आर्या मानकर या विद्यार्थिनीने हा प्रकार केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करत मयत विद्यार्थिनी आर्याची पुस्तकं, मोबाईल तपासासाठी जप्त केली आहेत.
ADVERTISEMENT
आर्या ही माऊंट कार्मेल शाळेत आठवीत शिकत होती. घडलेल्या प्रकाराबद्दल आर्याचे वडील हरिश्चंद्र मानकर यांनी माहिती दिली. “सकाळी रिक्षा न आल्यामुळे मी स्वतः तिला शाळेत सोडायला गेलो होतो. शाळा सुटल्यानंतर मी स्वतः तिला रिक्षातून घरी आणलं आणी नंतर कामावर गेलो.” यावेळी घरात हरिश्चंद्र यांची पत्नी मंजुषा, मुलगा हितेश आणि दुसरी मुलगी कौशिकाही उपस्थित होते. याच दरम्यान आर्याने आपल्या खोलीत आत्महत्या करत जीवन संपवल्याचं कळतंय.
पोलिसांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. आर्याच्या वही-पुस्तकांमध्ये काही ठिकाणी, I Love you death, मला मरायला आवडेल अशा अर्थाची काही वाक्य लिहून ठेवली आहेत. त्यामुळे आर्या गेल्या काही दिवसांपासून कोणत्या मानसिक स्थितीतून जात होती, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. यासाठी तिच्या शाळेतील विद्यार्थ्यांशीही पोलिसांनी बातचीत सुरु केली आहे. परंतू या घटनेमुळे नागपूर शहरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT