‘तरी मी देवेंद्रजींना तेव्हाच सांगत होतो, उद्धव म्हणजे…’, नारायण राणे काय म्हणाले?

मुंबई तक

05 Apr 2023 (अपडेटेड: 05 Apr 2023, 01:38 PM)

Narayan Rane: भाजपचे मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे (UBT)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसंच यावेळी एक किस्सा देखील त्यांनी सांगितला.

i was telling devendra fadnavis that time uddhav thackeray is a cheater narayan rane criticized

i was telling devendra fadnavis that time uddhav thackeray is a cheater narayan rane criticized

follow google news

Narayan Rane Press Conference: मुंबई: राज्यात सध्या ‘फडतूस’ शब्दावरून राजकारण रंगलं आहे. शिवसेनेचे (UBT)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फडतूस म्हणत टीका केली होती. ज्यानंतर आता भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. याचवेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांसोबतचा एक किस्साही सांगितला.. (i was telling devendra fadnavis that time uddhav thackeray is a cheater narayan rane criticized)

हे वाचलं का?

‘अरे हा माणूस आमच्या देवेंद्रवर बोलतोय. अरे देवेंद्रकडून किती कामं करून घेतली गोड-गोड बोलून.. तेव्हा मी देवेंद्रजींना सांगायचो.. अहो देवेंद्रजी मी 39 वर्ष राहिलोय. यांच्यासोबत तुम्ही उद्धव ठाकरेला ओळखत नाही. कधी तरी फसवतील. आता देवेंद्रना पटतंय.. राणे साहेब बोलले ते बरोबर आहे. उद्धव ठाकरे एक नंबरचा खोटारडा, विक्षिप्त, दगाबाज माणूस. पाच वर्ष देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 2019 ला मी सांगत होतो देवेंद्रजींना युती करू नका.. काही कामाचा नाही हा.. संपलाय..’ असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली.

पाहा पत्रकार परिषदेत नारायण राणे नेमकं काय-काय म्हणाले:

‘राज्याचे निष्क्रिय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ठाण्याला गेले आणि जाताना सांगितलं की, मी कोणाची तरी डिलिव्हरी करायला चाललो आहे. गरोदर आहे कोण तरी.. मार लागलाय.. कठीण अवस्था आहे.. म्हणून ते डिलिव्हरी करण्यासाठी गेले.. नवीन काम सुरू केलंय. मुख्यमंत्री पदावरून उतरल्यावर.’

‘खरं त्या महिलेला मार लागला होत्या.. माझ्याकडे डॉक्टरचं सर्टिफिकेट आहे.. त्यात असं म्हटलं आहे की, त्या गरोदर नव्हत्या.. त्यांना मार लागलेला नाही. डॉक्टर उमेश आरेगावकर यांचं सर्टिफिकेट आहे. असं असताना उद्धव ठाकरेंनी भाषण केलं ना ते महाभयानक आहे. त्या माणसाला चांगलं बोलता येतं की नाही हा प्रश्न आहे..’

अधिक वाचा – ‘…मग काडतूस कुठे घुसतं ते दाखवतो’, संजय राऊतांचा फडणवीसांना चॅलेंज

‘ते भाषण.. अत्यंत असभ्य.. शिवराळ आणि एखाद्या व्यक्तीविषयी असूया.. चीड असते तेव्हाच अशी भाषा वापरली जाते. मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तीने शोभा न देणारी भाषा वापरली.’

‘याच्या मंत्रिमंडळातील तीन-तीन लोकं जेलमध्ये जातात.. हा माणूस कोणावर बोलतोय… देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर.. त्याने अजून काही जणांची नावं घेतली.. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री यांच्याबद्दल बोलले.. ते पण खालच्या थराला.. लायकी आहे का पंतप्रधानांबद्दल बोलायची.. बाळासाहेबांचे पुत्र ही एक गोष्ट सोडली तर राज्याच्या विकासात योगदान काय आहे?’

‘बाळासाहेबांचं नाव आणि शरद पवारांची मेहरबानी यामुळे मुख्यमंत्री झाले. बाळासाहेब असते तर कधीही हे शक्य झालं नसतं. बाळासाहेबांच्या नखाचीही सर नाही..’

‘काय तर म्हणे.. उद्धव ठाकरे घणाघात.. अरे शेंबड्या माणासाचा घणाघात होऊ शकतो? तू असं का नाही म्हणत मी रस्त्यावर आलो तर… शिवसेना तुझ्यामुळे वाढली असं झालंय का?’

अधिक वाचा – “… त्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही”; ठाकरेंवर फडणवीसांचा पलटवार

‘अडीच वर्षात मुख्यमंत्री होते.. आता सांगतोय सैनिकांना की रस्त्यावर उतरा.. जे अडीच वर्षात कमवलं ना.. खोके वैगरे घेतले.. त्यातले काही दिले का शिवसैनिकांना… दानधर्म, मदत कोणाला केली का? कोरोना काळात औषधात 15 टक्के घेतले यांनी.. असा हा माणूस आहे.’

‘असा माणूस आमच्या देवेंद्रवर बोलतोय. अरे देवेंद्रकडून किती कामं करून घेतली गोड-गोड बोलून.. तेव्हा मी देवेंद्रजींना सांगायचो.. अहो देवेंद्रजी मी 39 वर्ष राहिलोय यांच्यासोबत तुम्ही उद्धव ठाकरेला ओळखत नाही. कधी तरी फसवतील. आता देवेंद्रना पटतंय.. राणे साहेब बोलले ते बरोबर आहे. उद्धव ठाकरे एक नंबरचा खोटारडा, विक्षिप्त, दगाबाज माणूस.’

‘सत्ता गेली हातातून.. मुख्यमंत्री पद गेलं.. आयुष्यात शिवसेनेला.. उद्धव ठाकरेला ते पद मिळणार नाही. आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस.. सपोर्टिंग पार्टनर म्हणून ठेवतात.’

अधिक वाचा – ‘Devendra Fadnavis फडतूस गृहमंत्री’ : उद्धव ठाकरेंचा चढला पारा; थेट राजीनाम्याची मागणी

‘पाच वर्ष देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 2019 ला मी सांगत होतो देवेंद्रजींना युती करू नका.. काही कामाचा नाही हा.. संपलाय.. रस्त्यावर या आणि अमूक करा.. उद्धव चल एक दिवशी तू जाहीर कर.. रस्त्यावर उतरतो.. आम्ही काय उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही.’

‘माझ्या नावाच्या अनेकांना सुपाऱ्या दिल्या याने.. मला उलट त्या लोकांचे फोन यायचे तुमची सुपारी दिलीए. अहो कुटुंबातील लोकांना याने सोडलं नाही. कोण आहेत कुटुंबातील याच्यासमोर… पत्नी आणि दोन मुलं.’

‘एखादा शिवसैनिक नावारुपाला आला की, हा त्याच्या मागे लागलाच. हा महाफडतूस आहे. मर्द भाषेबद्दल बोलतो.. किती वेळा बोलायचं तेच.. लायकी तरी आहे देवेंद्रच्या बरोबर.. देवेंद्रचं कार्य, वैचारिकता, निष्ठा.. यापैकी कोणते गुण आहे तुमच्यात उद्धव ठाकरे..’

अधिक वाचा – Uddhav Thackeray ठाण्यात; थेट हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतली शिवसेनेच्या वाघिणीची भेट

‘आता राष्ट्रवादील घेतायेत सोबत.. डोळे वैगरे मारतात.. अजित पवार त्या दिवशी मीडियासमोर डोळा मारत होते.. घ्या यांची मजा.. शिव्या द्यायचं काम उद्धव ठाकरे करू शकतो.’

‘उद्धव ठाकरे आमचे पंतप्रधान हे जगाच्या पाठीवर नाव कमवणारे आहेत. एक कुठली संस्था त्याला पैसे देऊन सांगितलं मी सगळ्यात बेस्ट मुख्यमंत्री… अशा लायकीचा माणूस आमच्या नेत्यांना नाव ठेवतो. अडचणीच्या वेळेला नाव ठेवतो. सुशांतच्या वेळेस मर्डर झाला तेव्हा फोन केले.. त्यांनी फक्त पाठ फिरवली ना.. तर योग्य जागी जाशील. अशी भाषा जर परत बोलला ना.. तर त्याचे परिणाम वाईट होईल हे मी सांगतो..’ असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे.

    follow whatsapp