Optical Illusion Test: जे लावतील बुद्धीला कस, तेच शोधून दाखवतील फोटोत लपलेला ससा

मुंबई तक

• 07:25 PM • 26 Aug 2024

Optical Illusion Latest Photo : सोशल मीडियावर दिवसेंदिवस ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. कारण रोजच्या धावपळीच्या जीवनात बुद्धीला चालना देण्यासाठी अशाप्रकारचे फोटोंचे कोडे सोडवणं अनेकांना आवडतं. पण ऑप्टिकल इल्यूजनचे काही फोटोंचे कोडं सोडवणं वाटतं तितकं सोपं नसतं.

Rabbit Optical Illusion Latest Photo

Rabbit Optical Illusion Latest Photo

follow google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनचा अतिशय कठीण फोटो व्हायरल झालाय

point

सशाच्या ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो एकदा पाहाच

point

गरुडासारखी नजर आहे? मग पाच सेकंदांच्या आत लपलेला ससा शोधून दाखवा

Optical Illusion Latest Photo : सोशल मीडियावर दिवसेंदिवस ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. कारण रोजच्या धावपळीच्या जीवनात बुद्धीला चालना देण्यासाठी अशाप्रकारचे फोटोंचे कोडे सोडवणं अनेकांना आवडतं. पण ऑप्टिकल इल्यूजनचे काही फोटोंचे कोडं सोडवणं वाटतं तितकं सोपं नसतं. कारण या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्यासाठी बुद्धीचा कस लावावा लागतो. अशाच प्रकारचा एक फोटो व्हायरल झाला असून त्या फोटोत लपलेला ससा तुम्हाला शोधून दाखवायचा आहे. त्यासाठी तुमच्याकडे फक्त ५ सेकंदांचा वेळ असणार आहे.

हे वाचलं का?

ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो पाहिल्यावर अनेक जण गोंधळात पडतात. यासारखे फोटो डोळ्यांना चकवा देणारे असतात. ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोंमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टी लपलेल्या असतात. त्या शोधण्याचं मोठं आव्हान असतं. कारण दिलेल्या वेळेत लपलेली गोष्ट शोधून काढणं हे फक्त तीष्ण नजर असलेल्या लोकांनाच जमेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मग आता बुद्धीला तल्लख करा आणि लपलेला ससा शोधून दाखवा.

या फोटोमध्ये लपलेला ससा शोधायचा असेल, तर तुम्हाला हा फोटो खूप बारकाईने पाहावा लागेल. या फोटोत एक पार्क दिसत आहे. या पार्कमध्ये काही लोक साफ-सफाईचे काम करत असल्याचं पाहायला मिळत आहेत. या लोकांमध्ये एक ससा लपला आहे. या सशाला शोधण्यासाठी पाच सेकंदांचा वेळ दिला आहे.

हे ही वाचा >> Train Viral Video: 'लाडक्या बहिणीचे 3000 आले, आता भाऊजी म्हणणार...', समोसा विकण्याची भन्नाट स्टाईल!

तुम्हाला असं वाटत असेल, तुमची बुद्धी वेगवान आहे, तर पाच सेकंदात हा ससा शोधून दाखवा. कारण हा ससा या पार्कमध्ये खूप चालाखीनं लपून बसला आहे. या फोटोत लपलेल्या सशाला शोधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण ससा शोधण्यात त्यांना अपयश आलं. पण तुमची नजर गरुडासारखी असेल, तर पाच सेकंदांच्या आत तुम्ही ससा शोधून दाखवाल. खूप प्रयत्न केल्यानंतरही तुम्हाला ससा शोधता आला नाही, तर आम्ही शेअर केलेला एक फोटो पाहा. त्यानंतर तुम्ही अगदी सहजपणे लपलेला ससा पाहू शकता.

    follow whatsapp