जुहू बीचवर फिरायला जायचं असेल कोव्हिड टेस्ट करावी लागणार असे आदेश आता मुंबई महापालिकेने काढले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जुहू बीचवर अँटीजन टेस्टिंग कॅम्पही लावण्यात आला आहे. चौपाटीवरचे फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते यांच्याही टेस्ट केल्या जाणार आहेत.
ADVERTISEMENT
अॅन्टिजेन टेस्ट करूनच चौपाटीवर प्रवेश करता येईल अशी व्यवस्था तयार करण्यात येते आहे. यासाठी स्थानिक पोलीस आणि क्लिनअप मार्शल यांचीही मदत घेतली जाणार आहे. चौपाटीवर फिरायला येणाऱ्यांनी मास्क घातला नसेल तरीही कारवाई केली जाणार आहे.
होळी साजरी करु नका, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आदेश
जुहू चौपाटीवर करण्या येणाऱ्या कोव्हिड चाचण्यांचा खर्च मुंबई महापालिका करणार आहे. मुंबई बाहेरून येणाऱ्या आणि मुंबईतल्या लोकांचंही आकर्षण हे जुहू चौपाटी आहे.
जुहू चौपाटीप्रमाणेच मुंबईतल्या बांद्रा स्टेशनवर बुधवारी म्हणजेच २४ तारखेला ६०० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ९ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. बांद्रा स्टेशनवर सकाळच्या पहिल्या ट्रेनपासून कोरोना चाचणी करण्यात येते आहे. आधी ताप पाहण्यात येतो. ताप जास्त असल्यास किंवा इतर काही लक्षणं असल्यास RTPCR टेस्ट करण्यात येते. आज संध्याकाळपर्यंत २१२ प्रवाशांचं स्क्रिनिंग करण्यात आलं. त्यापैकी ८२ जणांचं टेम्प्रेचर जास्त होतं या ८२ जणांपैकी ३ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत.
ADVERTISEMENT