अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई दरम्यान महिला अधिकाऱ्याची बोट छाटली गेल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात आज समोर आला. महापालिका सह आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अमरजित यादव या फेरीवाल्याने हल्ला करुन त्यांची बोटं छाटली, या हल्ल्यानंतर पिंपळे यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं कळतंय. घोडबंदर येथील एका खासगी रुग्णालयात पिंपळे यांच्यावर उपचार करण्यात आले.
ADVERTISEMENT
दरम्यान या घटनेनंतर विरोधी पक्षातील भाजपने पुन्हा एकदा सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
या हल्ल्याची दखल ठाणे महापालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांनी घेतली असून या प्रकरणातील दोषीवर योग्य ती कारवाई होईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. या घटनेत दोषी असलेल्यांवर योग्य कारवाई होईल कोणाचीही हयगय केली जाणार नाही. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन वर्मा यांच्याशी चर्चा केली असून यात योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचं आश्वासन महापौरांनी दिलं.
ठाणे पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. कासारवडवली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी दिली आहे.
ठाण्यात महिला सहाय्यक उपायुक्तांची बोटं छाटली; फेरीवाल्यांवरील कारवाईवेळची भयंकर घटना
ADVERTISEMENT