चंद्रपूर: अहो आश्चर्यम! म्हशीला झालं सहा पायांचं रेडकू, बघ्यांची गर्दी

मुंबई तक

• 11:41 AM • 22 Nov 2021

विकास राजूरकर, चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील मोरवाही या गावात म्हशीला झालेल्या एका रेडकूमुळे अवघ्या पंचक्रोशीत कुतूहल निर्माण झालं आहे. कारण हे रेडकू तब्बल सहा पायांचं आहे. केवळ पायच नाही तर या रेडकूला मूत्र विसर्जनाचे अवयवही दोन आहेत तसेच गुद्दद्वारदेखील दोन आहेत. त्यामुळे हे रेडकू सामान्य रेडकूंसारखं नाहीए. मोरवाही गावातील कालिदास वाकुडकर यांच्या मालकीच्या म्हशीने […]

Mumbaitak
follow google news

विकास राजूरकर, चंद्रपूर

हे वाचलं का?

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील मोरवाही या गावात म्हशीला झालेल्या एका रेडकूमुळे अवघ्या पंचक्रोशीत कुतूहल निर्माण झालं आहे. कारण हे रेडकू तब्बल सहा पायांचं आहे. केवळ पायच नाही तर या रेडकूला मूत्र विसर्जनाचे अवयवही दोन आहेत तसेच गुद्दद्वारदेखील दोन आहेत. त्यामुळे हे रेडकू सामान्य रेडकूंसारखं नाहीए.

मोरवाही गावातील कालिदास वाकुडकर यांच्या मालकीच्या म्हशीने एका विचित्र रेडकूला जन्म दिला आहे. दरम्यान, सहा पायांचं रेडकू जन्माला आल्याची माहिती गावात समजाताच. या रेडकूला पाहण्यासाठी गावातील अनेकांनी वाकुडकर यांच्या घरी गर्दी केली. हे रेडकू नेमकं आहे तरी कसं हे पाहण्यासाठी गावातील छोट्या मुलापासून अगदी अबाल वृद्धापर्यंत अनेकांनी गर्दी केली होती.

दरम्यान, या रेडकूबाबत जेव्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती मिळाली तेव्हा पशुवैद्यकीय अधिकारी पुरी यांनी तात्काळ मोरवाही येथे जाऊन त्यांनी रेडकूची संपूर्ण तपासणी केली.

यावेळी डॉक्टरांनी संपूर्ण तपासणी केल्यानंतर त्यांचा असं लक्षात आलं की, हे रेडकू दूध व्यवस्थित पित आहे. मात्र, अद्याप मूत्र आणि शौचाची जागा खुली व्हायची आहे. त्यामुळे या रेडकूला चंद्रपूरला हलवून शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

…तरच रेडकू जगू शकेल!

दरम्यान, या रडकूचे प्राण वाचवायचे असल्यास त्याच्यावर शस्त्रक्रिया करून जे अतिरिक्त दोन पाय आहेत. ते दोन पाय काढावे लागणार आहेत. परंतु रेडकूचे मालक कालिदास यांनी आपण एक दिवस वाट पाहू आणि नंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेऊ असं सांगण्यात आलं आहे.

आतापर्यंत अनेकदा काही प्राण्यांचा सामान्यपणे जन्म होत नसल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र, ज्या पद्धतीने या रेडकूला अनेक अधिकचे अवयव आहेत. ते पाहता हे रेडकू जगविण्यासाठी आता डॉक्टर अनेक प्रयत्न करत आहेत.

अगं अगं म्हशी…कोल्हापुरात भरली म्हशींची सौंदर्य स्पर्धा

आपल्या म्हशीने अशा प्रकरच्या रेडकूला पहिल्यांदाच जन्म दिल्याचं त्याच्या मालकांनी सांगितलं आहे. तसेच हे रेडकू जगावं यासाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यानुसार उपचार करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

पशवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशाप्रकारचं रेडकू हे जीवशास्त्रातील पहिलंच रेडकू असावं असा अंदाज व्यक्त केला आहे. दुसरीकडे नेमका कोणत्या दोषामुळे अशाप्रकारचं रेडकू जन्मास आलं आहे हे देखील तपासलं जाणार असल्याचं समजतं आहे.

    follow whatsapp