मिथिलेश गुप्ता
ADVERTISEMENT
डोंबिवली: डोंबिवलीतील एका महिलेने अनैतिक संबंधापोटी आपल्या प्रियकराच्या साथीने पतीची निर्घृण हत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. एवढंच नव्हे तर हत्येचा संशय आपल्यावर येऊ नये यासाठी तिने एक वेगळाच कट रचून पोलिसांनाही गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. पण कल्याण क्राइम ब्रांच पोलिसांनी मोठ्या शिताफिने महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेली माहितीनुसार, आरोपी महिलेने आपल्या पतीची हत्या करुन त्याचा मृतदेह बदलापूर-कर्जत रोडवरील नेरळ येथे झुडपात फेकून दिला होता. यावेळी आपलं कृत्य लपवण्यासाठी तिने पती बेपत्ता असल्याची खोटी तक्रार डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात नोंदवली होती. मात्र, कल्याण क्राइम ब्रांचने मोठ्या शिताफिने या प्रकरणाचा तपास करुन महिलेचे बिंग फोडलं.
यावेळी पोलिसी खाक्या दाखवताच तिने आपणच प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी लक्ष्मी पाटील हिच्यासह तिचा प्रियकर अरविंद उर्फ रविंद्र राम व सनी सागर या तिघा विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या.
प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, किचनमध्ये पुरला मृतदेह; मुलीच्या जबाबामुळे उघडकीस आला गुन्हा
मयत प्रवीण पाटील हा एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. तर लक्ष्मी ही डोंबिवलीमध्ये रिक्षा चालवायची. तिथेच तिची अरविंद या रिक्षाचालकासोबत ओळख झाली होती आणि नंतर त्यांच्यामध्ये प्रेमसबंध देखील जुळले होते.
दरम्यान, मानपाडा येथे राहणारा प्रवीण पाटील हा 4 जूनपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याची पत्नी लक्ष्मी हिने मानपाडा पोलीस ठाण्यात नोंदवली होती. बरेच दिवस उलटूनही प्रविणचा शोध लागत नव्हता त्यामुळे प्रविणच्या कुटुंबीयानी या संपूर्ण प्रकाराबाबत संशय येऊ लागला आणि त्यांनी कल्याण क्राइम ब्रांचकडे धाव घेतली.
प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, पोलिसांनी अशी सोडवली मर्डर मिस्ट्री
या प्रकरणाचा तपास करत असताना कल्याण क्राइम ब्रांचच्या पथकाचा प्रविणची पत्नी लक्ष्मी हिच्यावरील संशय बळावला. पोलिसांनी तिची चौकशी सुरु केली. यावेळी तिने खोटी माहिती दिल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
त्यामुळे पोलिसांनी लागलीच तिच्या संपर्कात असलेल्या अरविंद उर्फ रविंद्र राम व त्याचा मित्र सनी सागर याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. यावेळी या सर्व आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली.
अरविंदचे लक्ष्मीसोबत अनैतिक सबंध होते. याचीच कुणकुण लक्ष्मीचा पती प्रविणला लागली होती. या कारणावरून प्रवीण व लक्ष्मीमध्ये सतत वाद होत होते. त्यामुळे या दोघांनी प्रविणचा काटा काढायचं ठरवले. 2 जून रोजी रात्रीच्या सुमारास प्रवीण घरी असताना अरविंद व सनी घरी आले आणि त्यानी प्रविणला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.
अनैतिक संबंध… प्रेयसीची हत्या आणि मास्टरमाईंड प्रियकर, पुण्यातील नेमकं प्रकरण आहे तरी काय?
या कृत्यात लक्ष्मी देखील सहभागी होती. त्यांनतर तिघांनी त्याचा गळा दाबून हत्या केली व त्याचा मृतदेह रिक्षाने नेरुळ येथे नेऊन फेकून दिला. त्यानंतर संशय येऊ नये म्हणून लक्ष्मीने मानपाडा पोलीस ठाण्यात प्रविण बेपत्ता असल्याबाबत तक्रार नोंदवली होती.
पण कल्याण पोलिसांनी केलेल्या वेगवान तपासामुळे पत्नीचं बिंग फुटलं. त्यामुळे हत्येच्या आरोपाखाली मयत प्रविण पाटीलची पत्नी लक्ष्मी पाटील तिचा प्रियकर अरविंद व त्यांचा साथीदार सोनी याला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT