उस्मानाबादमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, शिक्षकाला पोलिसांनी केली अटक

मुंबई तक

07 Jul 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:11 AM)

गणेश जाधव, प्रतिनिधी, उस्मानाबाद उस्मानाबादमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर शाळेतल्या शिक्षकानेच बलात्कार केल्याची तसंच लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुलीने तिच्या पालकांना सांगितल्यानंतर या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पुण्यात 21 वर्षीय महिलेवर एकाच दिवशी दोनदा […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

गणेश जाधव, प्रतिनिधी, उस्मानाबाद

हे वाचलं का?

उस्मानाबादमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर शाळेतल्या शिक्षकानेच बलात्कार केल्याची तसंच लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुलीने तिच्या पालकांना सांगितल्यानंतर या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

पुण्यात 21 वर्षीय महिलेवर एकाच दिवशी दोनदा बलात्कार; आरोपी अटकेत

नेमकं काय आहे प्रकरण?

शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना उस्मानाबाद जिल्ह्यात घडली. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातल्या प्राथमिक विद्यालयात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर या शिक्षकाने वारंवार बलात्कार केला. ही विद्यार्थिनी गरदोर राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सदर शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक अधिनियमा अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे.

पीडित मुलगी दहावीत शिकणारी विद्यार्थिनी आहे. ही मुलगी दोन महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. या मुलीवर शिक्षकाने वारंवार बलात्कार केला. तसंच तिच्यावर लैंगिक अत्याचारही केले. ही मुलगी स्कुटीवरून प्रवास करत असताना तिला अचानक रक्तस्त्राव सुरू झाला. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी तिला जवळच्या रूग्णालयात दाखल केलं. त्यावेळी ही मुलगी दोन महिन्यांची गर्भवती राहिल्याचं समोर आलं आहे.

पालघरमध्ये दहावीचा निकाल लागण्याआधी अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार आणि हत्या

दहावीत शिकणाऱ्या या विद्यार्थिनीवर नराधम शिक्षकाने वारंवार बलात्कार केला. गेले अनेक दिवस हा नाराधम शिक्षक मुलीचा लैंगिक छळ करत होता. व्हाट्सअप द्वारे चॅटिंग करून कळंब येथील मुलीच्या आत्याच्या घरी कोणी नसताना तिच्या इच्छेविरुद्ध या शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. ही घटना वारंवार घडली. यानंतर ही मुलगी स्कुटीवरून जात असताना तिला रक्तस्त्राव होऊ लागला. यानंतर पीडित मुलीला रूग्णालयात नेलं असता ती दोन महिन्यांची गरोदर असल्याचं समोर आलं. ज्यानंतर तिच्या कुटुंबीयांना धक्काच बसला. तिने या प्रकरणानंतर घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

या प्रकरणी पीडित मुलीने शिक्षकाविरोधात जबाब नोंदवला आहे. या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर पीडित मुलीचं कुटुंब हादरून गेलं आहे. तसंच विद्यार्थिनींच्या पालकांमध्ये भीती पसरली आहे. कळंब पोलिसांनी या प्रकरणी शिक्षकाला अटक केली आहे. या शिक्षकाला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

    follow whatsapp