चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावांवर पुराचं संकट ओढावलं आहे. गावचे-गाव आणखी देखील पाण्यात असल्यानेगावकऱ्यांना पुरातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु आहे. आत्तापर्यंत हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्याचे कामप्रशासनाने केले आहे. आणखी देखील काही गावातील लोक पुरात अडकलेले असल्याचं कळतंय. त्यांना देखील बाहेरकाढण्याचं काम युद्ध पातळीवर सध्या सुरु आहे. पुराच्या पाण्यात माणसांसह जनावरं देखील अडकले आहेत.
ADVERTISEMENT
Nagpur SDRF कडून चंद्रपूरमध्ये बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे
चंद्रपूर जिल्ह्यातील 15 पैकी 9 तालुके सध्या पुराच्या पाण्यात आहेत. त्यामुळे मानवी हानीसह वित्त हानी देखील झालीआहे. मागच्या काही दिवसात मोठ्याप्रमाणात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाले, ओढ्याना पूरआला होता. वर्धा, वैनगंगा, इरई य नद्यांना पूर आला होता. पंधरा दिवसात दुसऱ्यांदा जिल्ह्यात पूर आलाय. दोनदिवसाअगोदरच पुराचे पाणी ओसरले होते. मात्र, ओव्हरफ्लो झालेल्या धरणातून पाणी सोडल्याने पुन्हा अनेक गावातपाणी शिरले. पूर्वीच्या पुरापेक्षा धरणाच्या पाण्याने आणखी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
भोगावती तालुक्यात पुराच्या पाण्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. घरात पाणी गेल्याने घरातील सर्व साहित्य पाण्यातजाऊन आर्थिक हानी झाली आहे. पाणीमध्ये जनावर वाहून गेल्याचे विदारक चित्र देखील अनेक भागात पाहायलामिळत आहे. वृद्ध, महिला, लहान मुले यांना सुरक्षितस्थळी नेण्याचं काम एनडीआरएफची टीम करत आहे. तसेच गुरांचंदेखील रेस्क्यू करण्याचं काम सुरु आहे. तीन दिवसाअगोदर पुराचं पाणी ओसरल्याने नागरिकांनी आपल्या घरीपोहचून साफसफाईचं काम सुरु केलं होतं.
परंतु धरणाचे दरवाजे उघडल्याने पुन्हा घरात पूर्वीपेक्षा जास्तप्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे पाऊस नसताना पुराचामारा चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. मुख्य रस्त्यांवर 10 ते 12 फूट पाणी भरल्याने लोकांचंमोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. हजारो नागरिकांना बाहेर काढलं असून आणखी देखील रेस्क्यू सुरु आहे. त्यामुळेलवकरात-लवकर परिस्थिती पूर्वपदावर यावी, यासाठी नागरिक प्रार्थना करत आहेत.
ADVERTISEMENT