राजधानीत कोरोना रुग्णसंख्येत वाढ, पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता; महाराष्ट्रात काय स्थिती?

मुंबई तक

• 02:38 AM • 16 Apr 2022

नवी दिल्ली: दिल्लीत ज्या वेगाने कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे त्यामुळे सरकारसह दिल्लीकरांची देखील चिंता वाढली आहे. गेल्या तीन दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिल्लीत मोठी वाढ झाली आहे. काल (15 एप्रिल) दिल्लीत कोरोनाचे 366 नवीन रुग्ण आढळले आहेत. अशा स्थितीत राजधानीत पुन्हा एकदा काही निर्बंध लावले जाऊ शकतात, असे बोलले जात आहे. या अनुषंगाने पुढील […]

Mumbaitak
follow google news

नवी दिल्ली: दिल्लीत ज्या वेगाने कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे त्यामुळे सरकारसह दिल्लीकरांची देखील चिंता वाढली आहे. गेल्या तीन दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिल्लीत मोठी वाढ झाली आहे. काल (15 एप्रिल) दिल्लीत कोरोनाचे 366 नवीन रुग्ण आढळले आहेत. अशा स्थितीत राजधानीत पुन्हा एकदा काही निर्बंध लावले जाऊ शकतात, असे बोलले जात आहे.

हे वाचलं का?

या अनुषंगाने पुढील आठवड्यात 20 एप्रिल रोजी डीडीएमएची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. त्या बैठकीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांचा आढावा घेऊन काही निर्बंध लादण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

मास्क वापरणे पुन्हा एकदा अनिवार्य केले जाऊ शकते, असेही बोलले जात आहे. यासोबतच मास्क न घातल्याने दंड आकारण्यास पुन्हा एकदा सुरुवात होऊ शकते. मास्क न घातल्यास सरकार 500 रुपयांचा दंड आकारु शकते.

दिल्ली मेट्रोमध्येही मास्कबाबत कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो. तेथेही मास्क न लावल्यास कारवाई केली जाईल. तसे, या सर्व निर्बंधांच्या दरम्यान, दिल्ली सरकार सतत एक गोष्ट सांगत आहे की ते शाळा बंद होणार नाहीत.

सरकारच्या म्हणण्यानुसार ते मुलांबाबत खूप गंभीर आहेत. त्यांच्या वतीने शाळांसाठी कोरोना मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. आता प्रत्येक शाळेने त्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असा शासनाचा प्रयत्न आहे. डीडीएमएच्या बैठकीत त्याबाबत काही घोषणाही होऊ शकतात.

DDMA ची ही महत्त्वपूर्ण बैठक पुढील आठवड्यात बुधवारी होणार आहे. लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीत आरोग्य मंत्री सतेंद्र जैन, दिल्लीचे पोलीस आयुक्त, मुख्य सचिव विजय देव यांच्यासह महसूल मंत्री कैलाश गेहलोत, NITI आयोगाचे सदस्य व्हीके पॉल हे देखील उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन दिल्ली सरकारनेही अनेक गोष्टींची तयारी केली आहे. राजधानीतील सर्व रुग्णालयांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमध्ये खाटांची कमतरता पडू नये यासाठी 65 हजार अतिरिक्त खाटांची व्यवस्था करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच लसीकरण मोहीम आणखी तीव्र करण्याचाही सरकार विचार करत आहे. सरकारी रुग्णालयात कोरोना लसीचा बूस्टर डोस दिला जाऊ शकतो. सरकार हा बूस्टर डोस मोफत देण्याचा विचार करत आहे.

याशिवाय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आदेशानुसार सर्व लहान-मोठ्या ऑक्सिजन टँकमध्ये टेलिमेट्री उपकरणे बसवण्यात आली आहेत. यामुळे ऑक्सिजनचे रिअल-टाइम मॉनिटरिंग होईल आणि आणीबाणीच्या वेळी आवश्यकतेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास मदत होईल.

महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती काय?

राजधानी दिल्ली जरी कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या बाबतीत दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात काल दिवसभरात 69 नवीन रुग्ण आढळले होते. तर 132 रुग्ण बरे होऊन घरी परतले होते. तर एका बाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता. राज्यात सध्या 1.87 टक्के एवढा मृत्यूदर आहे.

राज्यात सध्याच्या घडीला 681 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ज्यापैकी सर्वाधिक मुंबईत 341 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पुण्यात 187 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

    follow whatsapp