कोरोनाने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. त्याचसोबत राज्यात अनेक ठिकाणी बेड्स, ऑक्सिजन तसंच इंजेक्शनचा तुटवडा जाणवतोय. देशाची ही चिंताजनक परिस्थिती पाहून बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आता भारताला नव्या पंतप्रधानांची गरज आहे, असं ट्विट स्वराने केलं आहे. दरम्यान तिच्या या ट्विटवरून सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ झालेला पहायला मिळतोय.
स्वरा भास्कर तिच्या ट्विटमध्ये म्हणते, “देशातील नागरिकांना आपल्या प्रिय आणि जवळच्या व्यक्तींना तडफडताना पहायचं नसेल तर या देशाला एका नव्या पंतप्रधानाची गरज आहे.” दरम्यान स्वराच्या या ट्विटनंतर अनेकांनी तिला ट्रोलंही केलं आहे.
एका युजरने स्वराच्या या ट्विटला रिप्लाय देताना म्हटलंय की, 2024 पर्यंत तरी असं काही होऊ शकत नाही. तर 2024 पर्यंत यांना सहन कर, त्यानंतर तुला योगीजींना सहन करायचं आहे. आम्ही फार खूश आहोत…तुझं तू बघून घे, असंही एका युजरने ट्विट करत स्वराला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
ADVERTISEMENT