जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या कारवाईला आज आणखी एक यश मिळालं आहे. उरी येथील रामपूर सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. हे अतिरेकी काही दिवसांपूर्वीच पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात आल्याची माहिती समोर येते आहे.
ADVERTISEMENT
नांदेडचे सपुत्र होणार भारताचे नवे हवाईदल प्रमुख, विवेक चौधरींकडे मोठी जबाबदारी
या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यानंतर भारतीय लष्कराने मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. ५ एके-४७ रायफल, ८ पिस्तुल आणि ८० हँड ग्रेनेड असा साठा लष्कराच्या ताब्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय जवानांनी उरी येथे सीमेपलीकडून भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडला होता.
दुसरीकडे पंजाब पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना शस्त्रसाठ्यासह अटक केली आहे. पोलिसांनी या अतिरेक्यांकडून एक विदेशी पिस्तुल, 11 राउंड, एक ग्रेनेड आणि एक आयईडी स्फोटके जप्त केली आहेत. या कारवाईत पोलिसांनी एक स्विफ्ट गाडीही जप्त केली आहेत. पंजाब पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दहशतवादी हल्ला वेळेत टळला आहे.
पंजाबच्या तरनतारण जिह्यात पोलिसांनी संपूर्ण क्षेत्राला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली आहे. हे तीन दहशतवादी पंजाब येथील मोगा जिल्ह्याचे रहिवासी आहेत. कुलविंदर सिंह, कमलप्रीत सिंह आणि कंवरपाल सिंह अशी या तिघांची नावे आहेत.
ADVERTISEMENT