समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लेटेंट' सध्या चांगलाच वादात सापडला आहे. त्याच्या या नव्या शोमध्ये आलेल्या युट्यूबर रणवीर अलाहबादिया आला होता. रणवीर अलाहबादियाची सध्या एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होतेय. यामध्ये युट्यूबर्स रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मखीजा हे स्पर्धकांना प्रश्न विचारताना दिसत आहेत.रणवीर स्पर्धकाला असं काहीतरी विचारतो, जे आम्ही इथे लिहू सुद्धा शकत नाही. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी या तिघांवरही टीका केली आहे. एवढंच नाही तर काही युजर्सनी 'सांस्कृतिक मंत्रालयाला' या तिघांवर कारवाई करण्याची मागणीही केली.
ADVERTISEMENT
'डार्क कॉमेडीच्या नावाखाली अश्लीलता...'
'इंडियाज गॉट लॅटेंट' या शोमध्ये आशिष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्वा मखीजा सारखे कंटेंट क्रिएटर्स पाहुणे परीक्षक म्हणून सहभागी झाले होते. अपूर्वा मखीजा इंस्टाग्रामवर 'द रिबेल किड' म्हणून ओळखली जाते. तर, रणवीर इलाहाबादिया हा एक प्रसिद्ध युट्यूबर, पॉडकास्टर आणि व्यावसायिक आहे. हा शो पाहिल्यानंतर, युजर्सनी सोशल मीडियावर म्हटलंय, "रणवीर आणि अपूर्वाने डार्क कॉमेडीच्या नावाखाली अश्लीलता दाखवली आहे."
हे ही वाचा >> CM Devendra Fadnavis राज ठाकरे यांच्या भेटीला, राऊत म्हणाले शिवाजी पार्कवर कॅफे उघडलाय...
'अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही...'
सुप्रसिद्ध लेखक आणि कथाकार 'नीलेश मिश्रा' यांनी या शोची एक क्लिप शेअर केली आणि लिहिले. “आपल्या देशाच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला आकार देणाऱ्या हे कॉन्टेन्ट क्रिएटर बघा. मला माहिती आहे त्यांचे प्रत्येकाचे लाखो फॉलोअर्स आहेत. हा कॉन्टेन्ट फक्त प्रौढ लोकांसाठी बनवलेला नाही. जर अल्गोरिथममध्ये असेल तर, लहान मूलही ते सहज पाहू शकतात. तुमच्यासारख्या प्रेक्षकांनी अशा लोकांना सामान्य बनवलं आहे. भारतात सभ्यतेला प्रोत्साहन दिले जात नाहीये. हे क्रिएटर्स त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि पैसे कमविण्यासाठी शक्य तितक्या खालच्या पातळीला जातायत. हे निर्माते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही बोलतात आणि त्यातून सुटून जातात.”
युजर्सकडून जोरदार टीका
हे ही वाचा >> Jitendra Awhad : "...नाहीतर मी तुला झोडणार, तुझी लायकी काय?", राहुल सोलापूरकरला जितेंद्र आव्हाड यांचा थेट इशारा
एका युजरने लिहिलं की, 'कौन बनेगा करोडपती' मध्ये असे चेहरे आणल्याबद्दल अभिनेते अमिताभ बच्चन यांना लाज वाटली पाहिजे. अलीकडेच कंटेंट क्रिएटर्स तन्मय भट, भुवन बाम आणि कामिया जानी 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये दिसले होते.
ADVERTISEMENT
