भारताची लोकसंख्या २१०० सालापर्यंत तब्बल 41 कोटींनी कमी होऊ शकते, असे एका अभ्यासात समोर आले आहे. 2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या ही 121 कोटी इतकी होती. सध्या भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. परंतु पुढील 78 वर्षांत त्याची लोकसंख्या 41 कोटींनी कमी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लॅन्सेट नियतकालिकात प्रकाशित अहवालातून हा दावा करण्यात आला आहे. लोकसंख्या वाढीच्या समस्येला तोंड देणाऱ्या जगासाठी ही चांगली बातमी आहे.
ADVERTISEMENT
भारताची लोकसंख्या घनता कमी होणार
भारताची लोकसंख्या घनता येत्या काही वर्षांत लक्षणीयरित्या कमी होण्याचा अंदाज आहे. भारत आणि चीनची लोकसंख्या या क्षणी सारखीच दिसते परंतु त्यांच्या घनतेमध्ये खूप फरक आहे. भारतात दर चौरस किलोमीटरमध्ये सरासरी ४७६ लोक राहतात. तर चीनमध्ये हेच प्रमाण १४८ लोक आहे. सन 2100 पर्यंत भारताची लोकसंख्या घनता ३३५ व्यक्ती प्रति किमी चौ.पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. भारताच्या लोकसंख्येच्या घनतेत झालेली घट ही संपूर्ण जगाच्या अंदाजापेक्षा खूपच जास्त असेल असा अंदाज आहे.
चीनमध्ये वाढत्या लोकसंख्येला त्रस्त होऊन एकच मुल जन्माला घालण्यासंबधीचा कायदा आणला गेला. त्याचं कटेकोर पालण देखील करण्यात येत आहे. तर भारतात देखील मागील काही वर्षांपासून ‘हम दो हमारे दो’ असा नारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर शिक्षित, नोकरदार महिला उशिराने आई होण्याचा विचार करतात. १९६० मध्ये जगभरात एक महिला सरासरी ५.२ अपत्ये जन्माला घालत होती. आज हे प्रमाण २.४ मुलांवर आले. २१०० पर्यंत ते १.६६ वर जाईल. त्यामुळे पुढील काळात या सर्व गोष्टींचा परिणाम लोकसंख्येवर दिसणार आहे.
चीनची लोकसंख्या 93 कोटींनी घटणार
चीनची लोकसंख्या वृद्धत्वाकडे झुकली आहे. 2100 मध्ये चीनची लोकसंख्या तब्बल 93.2 कोटींनी कमी होऊन केवळ 49.4 येईल, जी आजच्या तुलनेत खुप कमी असेल, असे वृत इंडिया टुडेने दिले आहे. हे अंदाज कमी प्रजनन दराच्या परिस्थितीवर आधारित आहेत. दुसर्या शब्दांत सांगायचे तर, 2050 पर्यंत एकूण प्रजननक्षमता 0.5 जन्मांपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.प्रजनन दरात घट झाल्यामुळे लोकसंख्येतील घट अपेक्षित आहे. सध्याच्या कमी प्रजनन दराच्या परिस्थितीवर आधारित, भारताचा प्रजनन दर प्रति स्त्री 1.76 वरून 2032 मध्ये 1.39, 2052 मध्ये 1.28, 2082 मध्ये 1.2 आणि 2100 मध्ये 1.19 पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
अफ्रिकन देशांमध्ये लोकसंख्येत वाढ होऊ शकते
स्टॅनफोर्ड अभ्यासात नमूद केले आहे की, जसजसे देश अधिक श्रीमंत होत जातात, तसतसे प्रजनन दर स्थिर लोकसंख्येसह नव्हे तर घटत्या लोकसंख्येसह स्थिर पातळीवर कमी होत असल्याचे दिसून येते.” लोकसंख्येतील हळूहळू वाढ संधींच्या नवीन खिडक्या उघडू शकते हे लक्षात घेता, आफ्रिकन देशांमध्ये या शतकाच्या उत्तरार्धात लोकसंख्या वाढण्याची शक्यता आहे.तर काँगो, इजिप्त, इथिओपिया आणि नायजेरिया सारख्या देशांमध्येही लोकसंख्येत येणाऱ्य काही वर्षात वाढ होऊ शकते..
ADVERTISEMENT