अहमदनगरमधले प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची प्रकृती बिघडली आहे. यामुळे निवृत्ती महाराज इंदुरीकर ३० मे पर्यंतचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. इंदुरीकर महाराज हे सोशल मीडियावर चांगलेच प्रसिद्ध आहेत. त्यांचे अनेक व्हीडिओ व्हायरल होत असतात. याच इंदुरीकर महाराजांची प्रकृती बिघडली आहे.
ADVERTISEMENT
निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी यासंदर्भात एक पत्र लिहून लवकरच बरा होईन आणि आपल्या सगळ्यांच्या सेवेत येईन. आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या मागे आहेत असंही म्हटलं आहे. ह.भ. प. निवृत्ती महाराज देशमुख यांची प्रकृती बिघडल्याने ३० मेपर्यंत नियोजित कार्यक्रम रद्द कऱण्यात आले आहेत. इच्छा असूनही कार्यक्रमास येऊ शकत नाही त्यामुळे कार्यक्रमाच्या संयोजकांची, आयोजकांची गैरसोय होते आहे त्याबद्दल मी दिलगीर आहे असंही इंदुरीकर महाराजांनी म्हटलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार इंदुरीकर महाराजांना किडनी स्टोनचा त्रास होतो आहे. याच आजारावर संगमनेर या ठिकाणी महाराजांवर हायट्रोथेरेपी केली जाणार आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आराम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ३० तारखेपर्यंत त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
आपल्या अनोख्या शैलीत भजन म्हणणं, वेगवेगळी उदाहरणं देणं, किर्तन रंजक करणं या सगळ्यासाठी इंदुरीकर महाराज हे तरूणांमध्ये जास्त लोकप्रिय आहेत. वादग्रस्त विधानांमुळेही ते चर्चेत आले होते.
इंदुरीकर महाराजांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी आराम करण्यास संगितले आहे. याआधी इंदुरीकर महाराज परतूर शहरात कीर्तनासाठी निघाले असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला होता. मात्र सुदैवाने या अपघातात त्यांना कोणतीही इजा झालेली नव्हती. यावेळी ते आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करत होते. यावेळी लाकडं वाहून नेणाऱ्या एका ट्रॉलीला इंदुरीकर महाराज यांची स्कॉर्पिओ धडकल्याने हा अपघात झाला होता. आता इंदुरीकर महाराज यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
ADVERTISEMENT