कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी आतापर्यंत अनेक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये आता ‘The art of living’ ही संघटना सुद्धा मदतीसाठी पुढे आली आहे. श्री श्री रविशंकर यांनी कोरोना पीडितांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ‘मिशन जिंदगी’ची घोषणा केली होती. तर या मिशन जिंदगी अंतर्गत अनेक बॉलिवूड कलाकारांनी मदत करण्यासाठी पुढे आलेत.
ADVERTISEMENT
मिशन जिंदगी सोबत मिळून राजकुमार हिरानी, करण जोहर, महावीर जैन, भूमी पेडणेकर, कार्तिक आर्यन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, कपिल शर्मा, बादशाह, वरदा नाडियाडवाला, वरुण शर्मा आणि अनेक सेलिब्रिटी कोरोना रूग्णांची मदत करत आहेत.
मिशन जिंदगी 17 मेपासून सुरुवात करण्यात आली. या अतंर्गत हॉस्पिटलची माहिती, ऑक्सिजन बँक, रुग्णवाहिका, कॉलवर उपलब्ध होणारे डॉक्टर, मानसिक आरोग्य, फूड आणि इम्यूनिटी किट या सर्व सुविधा देण्यात येत आहेत.
यामध्ये अभिनेता कार्तिक आर्यननेही मदतीसाठी पुढाकार घेतला असून ‘लोकांना मदत करण्याची चेन तुटू नये’ असं त्याने म्हटलंय. तर अभिनेत्री तापसी पन्नूने देखील ट्विट करत ‘प्रत्येक लाईफ गरजेची आहे, चला देशातल्या लोकांची मदत करूया’ असं आवाहन केलंय.
ADVERTISEMENT