सरकार कुठल्या गोष्टीवर किती गंभीर होईल, सांगता येत नाही. काही वेळा अपेक्षित नसलेल्या आणि आश्चर्याचा धक्का देणाऱ्या गोष्टींचीही सरकारकडून दखल घेतली जाऊ शकते, याची प्रचिती नागपूर येथे सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात आलीये. चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई फेक प्रकरण सरकारने फारच गंभीरपणे घेतलंय आणि असा प्रकार अधिवेशनात घडू नये म्हणून चक्क पेन जप्त केलेत.
ADVERTISEMENT
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा चालवल्याचं विधान केलं. या विधानाचे इतके तीव्र पडसाद उमटले की चंद्रकांत पाटालांच्या चेहऱ्यावर शाई फेकण्यात आली.
‘आमच्याकडे पोलिसांकडून माहिती आलीये’, एकनाथ शिंदे भडकले, विरोधकांना सुनावलं
पिंपरी चिंचवडमध्ये एका खासगी भेटीदरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांनी केलेल्या निषेधार्थ शाई फेकण्यात आली. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी खबरदारी म्हणून माफी मागो आंदोलनात काचेची शिल्ड वापरली. आता शाई फेकीच्या सरकारही सावध झालं.
हिवाळी अधिवेशन: अजितदादा भडकले, CM शिंदेंचा हल्ला; पाहा अधिवेशनात काय घडलं
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपुरात सुरूवात झाली. अधिवेशनाचं वार्ताकंन करण्यासाठी जाणाऱ्या पत्रकारांसह इतरांनाही सुरुवातीलाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण विधिमंडळ परिसरात प्रवेश करणाऱ्या नागरिकांच्या खिशावर कर्मचारी नजर ठेवून होते. ज्यांच्या खिशाला शाईचे पेन होते, त्यांचे पेन कर्मचाऱ्यांकडून जप्त करण्यात आले. या प्रकारानं शाई फेक प्रकरण सरकारने खूप गंभीरपणे घेतलंय, अशी जोरदार चर्चा रंगली होती.
ADVERTISEMENT