मुंबई: फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर आता पुन्हा एकदा गंभीर आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आता अशा आरोप केला आहे की, ‘अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपसोबत राहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांच्यावर दबाव आणला होता.’ आव्हाडांच्या या आरोपामुळे आता नवं राजकारण सुरु झालं आहे.
ADVERTISEMENT
‘शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडी मध्ये न जाता भाजपा बरोबर राहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखील प्रयत्न केला होता. अजून पुरावे काय पाहिजेत.’ असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहेत. आव्हाडांनी केलेला हा आरोप अत्यंत गंभीर असून आता याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर काही कारवाई केली जाणार का? याबाबत देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Phone Tapping अत्यंत गंभीर, रश्मी शुक्लांनी केली महाराष्ट्राची बदनामी-जितेंद्र आव्हाड
पाहा राजेंद्र पाटील-यड्रावकर नेमके आहेत तरी कोण
राजेंद्र पाटील-यड्रावकर हे सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, सांस्कृतिक कार्य, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य, अन्न आणि औषध प्रशासन या खात्यांचे ते राज्यमंत्री आहेत. 2019 विधानसभा निवडणुकीत यड्रावकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ मतदारासंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. सध्या ते महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्य कोट्यातून राज्यमंत्री आहेत. कारण विधानसभा निवडणुकीनंतर यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता.
परवानगीशिवाय रश्मी शुक्लांनी फोन टॅप केले, नंतर मुख्यमंत्र्यांसमोर रडल्या – जितेंद्र आव्हाड
2019 विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. बहुमतापासून भाजप बरंच दूर होतं. अशावेळी जास्तीत जास्त अपक्ष आमदार आपल्याकडे ओढण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेत चढाओढ लागली होती. त्यातच मुख्यमंत्री पदावरुन दोन्ही नेत्यांमध्ये बराच तणाव निर्माण झाला होता. अशावेळी अपक्ष आमदारांचा पाठिंबा ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची होती. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेकडून आमदार गळाला लावण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात होते.
‘भाजपच्या एजंट’ असा आरोप झालेल्या रश्मी शुक्ला कोण?
‘Phone Tapping अत्यंत गंभीर, रश्मी शुक्लांनी केली महाराष्ट्राची बदनामी’
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर कालही गंभीर आरोप केले होते. रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगचं कुभांड रचलं आहे, त्याबद्दल कॅबिनेटच्या बैठकीत सगळ्याच मंत्र्यांनी संताप व्यक्त केला असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हणाले होते. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा कट करण्यात येतो आहे. फोन टॅपिंग प्रकरणासाठी संमती घेतलं नव्हती. संमती न घेता त्यांनी फोन टॅप केले. असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होतं. फोन टॅपिंगसाठी ज्यांच्या नंबरबाबत संमती घेतली होती त्या नंबर्सचे फोन टॅपच झालेले नाहीत असंही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे.
सीताराम कुंटे यांच्याकडून कोणत्याही प्रकारची संमती घेण्यात आली नव्हती. रश्मी शुक्ला यांनी अनेक महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांचे फोन टॅप केले असतील असा संशय आम्हाला आहे. रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडी सरकारचा विश्वासघात केला. आम्ही जो काही विश्वास त्यांच्यावर दाखवला होता त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होतं.
ADVERTISEMENT