Indian Railway : काशी विश्वनाथ ते पशुपतीनाथ दर्शन; IRCTC चे जबरदस्ट टूर पॅकेज

मुंबई तक

• 07:28 AM • 17 Mar 2023

IRCTC Tour Package : IRCTC देशाच्या विविध भागात धार्मिक आणि पर्यटन स्थळांच्या टूर पॅकेजची सुरूवात करत आहे. यात आता ‘भारत-नेपाळ आस्था यात्रा पर्यटन ट्रेन’च्या माध्यमातून भारतातील अयोध्या (Ayodhya), वाराणसी (Banaras), प्रयागराज (Prayagraj) आणि नेपाळमधील (Nepal) पशुपतीनाथ (काठमांडू) या धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी 10 दिवसांचं जबरदस्त टूर पॅकेज लॉंच करत आहे. या दौऱ्याच्या 10 दिवसांत चार […]

Mumbaitak
follow google news

IRCTC Tour Package :

हे वाचलं का?

IRCTC देशाच्या विविध भागात धार्मिक आणि पर्यटन स्थळांच्या टूर पॅकेजची सुरूवात करत आहे. यात आता ‘भारत-नेपाळ आस्था यात्रा पर्यटन ट्रेन’च्या माध्यमातून भारतातील अयोध्या (Ayodhya), वाराणसी (Banaras), प्रयागराज (Prayagraj) आणि नेपाळमधील (Nepal) पशुपतीनाथ (काठमांडू) या धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी 10 दिवसांचं जबरदस्त टूर पॅकेज लॉंच करत आहे. या दौऱ्याच्या 10 दिवसांत चार महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आणि वारसा स्थळांना भेट दिली जाईल. या टूर पॅकेजची सुरुवात 31 मार्च 2023 ते 09 एप्रिल 2023 या कालावधीत होणार आहे. (IRCTC Tour Package: Darshan from Kashi Vishwanath to Pashupatinath)

या ठिकाणांना दिल्या जाणार भेटी :

अयोध्या- रामजन्मभूमी मंदिर, हनुमान गढी, सरयू घाट, नंदीग्राम

काठमांडू- पशुपतीनाथ मंदिर, दरबार स्क्वायर, स्वयंभूनाथ स्तूप.

वाराणसी- तुलसी मानस मंदिर, संकटमोचन मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि मंदिर, वारणासी घाटावर गंगा आरती.

प्रयागराज- गंगा-यमुना संगम, हनुमान मंदिर.

सुविधा आणि भाडे :

पर्यटकांसाठी या पॅकेजमध्ये 3 एसी ट्रेनचा प्रवास, तीन वेळेच्या जेवणासह नॉन-एसी बसने स्थानिक प्रवासाचा समावेश आहे. या टूर पॅकेजसाठी लागणाऱ्या पैशांबद्दल बोलायचं तर सुपीरिअर श्रेणीमधील एका व्यक्तीसाठी पॅकेजची किंमत 41 हजार ९० रुपये आहे, तर दोन किंवा तीन लोकांसाठी पॅकेजची किंमत 31 हजार 610 रुपये आहे. यामध्ये, डबल आणि ट्रिपल शेअरमध्ये एसी बजेट हॉटेल्समध्ये सुविधा करण्यात येणार आहे. तसंच नॉन-एसी हॉटेल रूममध्ये क्वाड शेअरवर वॉश एन चेंजचीही सुविधा दिली जाणार आहे.

आशिष शेलार-भास्कर जाधवांमध्ये शाब्दिक चकमक, नार्वेकर म्हणाले…

तर स्टँडर्ड श्रेणीत एका व्यक्तीसाठी पॅकेजची किंमत 36 हजार 160 रुपये आहे. दोन/तीन व्यक्तींसाठी पॅकेजची किंमत 27 हजार 815 रुपये प्रति व्यक्ती आहे. यामध्ये नॉन एसी बजेट हॉटेलमध्ये डबल/ट्रिपल शेअरवर राहण्याची सोय केली जाणार आहे. यासोबतच मल्टी शेअरवर नॉन एसी हॉटेल रूममध्ये वॉश एन चेंजची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Crime : सोशल मिडीयावर मैत्री, दारु पाजून बलात्कार, अन् धर्मांतर करुन लग्न…

ईएमआयवरही करता येईल बुकिंग :

दरम्यान, या पॅकेजची सुविधा ईएमआयवरही उपलब्ध आहे. या पॅकेजचे बुकिंग प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर केले जाणार आहे. या प्रवासाच्या बुकिंगसाठी पर्यटन भवन, गोमती नगर, लखनऊ येथे असलेल्या IRCTC कार्यालयातून आणि IRCTC च्या www.irctctourism.com या वेबसाटईटवरूनही ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे.

    follow whatsapp