Narayan Rane: ठाकरे सरकार सिंधुदुर्गातील ‘त्या’ फाइल पुन्हा ओपन करणार?

मुंबई तक

• 03:48 AM • 26 Aug 2021

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्याचे पडसाद अवघ्या महाराष्ट्रात उमटले. याप्रकरणी राणेंना अटकही झाली. सध्या राणे जामिनावर बाहेर आहेत. असं असताना राणेंनी काल (25 ऑगस्ट) रोजी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा शिवसेनेला आव्हान दिलं आहे. ‘मी कोणालाही घाबरत नाही, मी सगळ्यांन पुरून उरलोय. शिवसेना माझं काहीही करु […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्याचे पडसाद अवघ्या महाराष्ट्रात उमटले. याप्रकरणी राणेंना अटकही झाली. सध्या राणे जामिनावर बाहेर आहेत. असं असताना राणेंनी काल (25 ऑगस्ट) रोजी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा शिवसेनेला आव्हान दिलं आहे.

हे वाचलं का?

‘मी कोणालाही घाबरत नाही, मी सगळ्यांन पुरून उरलोय. शिवसेना माझं काहीही करु शकत नाही, मी त्यांच्या कोणत्याही कारवाईला घाबरत नाही.’ असं म्हणत राणेंनी शिवसेनेला आव्हान दिलं होतं.

दरम्यान, राणेंचा पूर्वइतिहास पाहता ते काही गप्प बसणाऱ्या नेत्यांपैकी नाहीत. ते शिवसेनेवर एखादा मोठा वार करु शकतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन ठाकरे सरकार राणेंविरोधात दुसरा डाव टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण तसे संकेत ‘सामना’च्या अग्रलेखातून देखील देण्यात आले आहेत.

सिंधुदुर्गातील काही हत्या आणि बेपत्ता प्रकरणातील जुन्या फाइल ठाकरे सरकार पुन्हा उघडण्याची तयारीत आहे का असा प्रश्न आजच्या अग्रलेखामुळे निर्माण झाला आहे. राणेंना पुन्हा अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे का, असा प्रश्नही या निमित्ताने पडला आहे. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार काय आहे हे आपण आधी जाणून घेऊयात.

आधी पाहूयात ‘सामना’च्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय:

‘नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरुन उठवले व अटक केली असे त्यांचे लोक बोलत आहेत. कायद्याला, पोलिसांना सहकार्य केले असते तर ही वेळ आली नसती. राणे यांना जेवणावरुन उठवणं वाईटच; पण सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे यांना जेवणावरुन, भर संसारातून कायमचे कोणी उठवले याचा नव्याने तपास ‘ठाकरे’ सरकारने करायला हवा. कायद्याचे राज्य मोडण्याचा प्रयत्न करणे हे गांजा मारुन पडण्याइतके सोपे नाही.’ असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

सिंधुदुर्गातील ‘त्या’ फाइल पुन्हा सुरु होणार?

सिंधुदुर्गातील श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे यांच्यापैकी काही जणांच्या हत्या झाल्या तर काही जण बेपत्ता झाले. जे अद्यापही सापडू शकलेले नाहीत. मात्र, असं असलं तरी या प्रकरणांमध्ये कोणताही गुन्हा अद्याप राणेंविरोधात सिद्ध होऊ शकलेला नाही. चार प्रकरणांपैकी फक्त श्रीधर नाईक हत्या प्रकरणात राणेंना आरोपी करण्यात आलं होतं. पण या प्रकरणात देखील कोर्टाने त्यांची निर्दोष सुटका केली होती.

मात्र, असं असलं तरीही आता पुन्हा एकदा ‘सामना’तून स्पष्टपणे म्हणण्यात आलं आहे की, या सगळ्या प्रकरणांचा तपास ठाकरे सरकारने पुन्हा एकदा करायला हवा.

Shiv Sena vs Rane: ‘राणेंनी स्वत:ला महान समजणं बंद करावं’, ‘सामना’तून राणेंना सल्ला

त्यामुळे शिवसेना या जुन्या प्रकरणांच्या फाइल पुन्हा ओपन करुन राणेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करु शकतं. मात्र, असं असलं तरी ठाकरे सरकार या फाइल पुन्हा ओपन करणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कारण सध्या तरी या जुन्या प्रकरणांचा तपास व्हावा अशी मागणी ही फक्त सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलेली आहे.

दुसरीकडे जर ठाकरे सरकारने खरोखरच या जुन्या प्रकरणांचा तपास सुरु केला तर मात्र, येत्या काळात नेमकं काय घडतं याकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागून असेल. आगामीकाळात नारायण राणे यांना राजकीय दृष्ट्या अडचणीत कसं आणता येईल, यावर शिवसेनेचा भर असण्याची शक्यता आहे

    follow whatsapp