बॉलिवूडची ब्युटी क्वीन आणि हॉट अॅक्ट्रेस जॅकलिन फर्नांडिस पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी तिच्या चर्चेत असण्याचं कारण सुकेश चंद्रशेखर नाही. तर एक इटालियन अभिनेता आहे. बॉलिवूडमध्ये अशी जोरदार चर्चा आहे की जॅकलिन एका इटालियन अभिनेत्याला डेट करते आहे. सुकेश चंद्रशेखरसोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. त्यानंतर या दोघांची चौकशीही झाली. अशात आता एका इटालियन अॅक्टरला जॅकलिन डेट करत असल्याची चर्चा आहे.
ADVERTISEMENT
जॅकलिन फर्नांडिस सुकेश चंद्रशेखरमुळे ईडीच्या जाळ्यात कशी अडकली?
जॅकलिन फर्नांडिस नेमकी कोणत्या इटालियन अभिनेत्याला डेट करते आहे?
बॉलिवूडमध्ये ही जोरदार चर्चा आहे की जॅकलिन फर्नांडिस 365 Days या सिनेमात झळकलेल्या मिशेल मोरोन या अभिनेत्याला डेट करते आहे. जॅकलिन आणि मिशेल या दोघांनी व्हीडिओ साँग मुड मुड के ना देख या व्हीडिओ अल्बममध्ये सोबत काम केलं होतं. त्या गाण्यात या दोघांची सिझलिंग केमिस्ट्री पाहण्यास मिळाली होती. तेव्हापासूनच हे दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत अशा चर्चा जोरदार रंगल्या आहेत. हे गाणं साधारण सहा महिन्यांपूर्वी आलं होतं.
डेटिंगच्या बातम्यांबाबत काय म्हणाला मिशेल मोरेन?
बॉलिवूडमधल्या या बातम्या अभिनेता मिशेल मोरेनपर्यंतही पोहचल्या आहेत. मिशेलला एका पत्रकाराने इंस्टा स्टोरी आणि बॉलिवूडच्या या बातम्या ज्या येत आहेत त्यांना अनुसरून हा प्रश्न विचारला की जॅकलिन आणि तू रिलेशनमध्ये आहात का? असा प्रश्न विचारला त्यावर तो म्हणाला की मी पण या बातम्या ऐकल्या आहेत पण या चर्चांमध्ये काही तथ्य नाही. मी सध्या कुठल्याही पार्टनरच्या शोधात नाही. मी सिंगल आहे, मी माझ्या करिअरवर फोकस करतोय. असं मिशेलने म्हटलंय.
कोण आहे इटालियन अभिनेता मिशेल मोरोन?
मिशेल मोरोन हा एक इटालियन अभिनेता आहे. तसंच तो एक मॉडेल, गायक आणि फॅशन डिझायनर आहे. नेटफ्लिक्सवर २०२० मध्ये आलेला सिनेमा 365 Days या मध्ये मिशेल होता. त्यामुळे मिशेलची ओळख जगाला झाली. मिशेल जॅकलिनसोबत मुड मुडके ना देख या गाण्यात दिसला होता. हे गाणं लोकांना खूप आवडलं होतं. या गाण्यातली या दोघांची केमिस्ट्री लोकांना आवडली होती.
जॅकलिन फर्नांडिस बऱ्याचदा चर्चेत असते. सिनेमांशिवाय तिची चांगलीच चर्चा झाली ती सुकेश चंद्रशेखरमुळे. सुकेश चंद्रशेखरने एका व्यावसायिकाकडून २०० कोटींची खंडणी घेतल्याचा आरोप आहे. एवढंच नाही तर तो जॅकलिनला डेटही करत होता. ईडीने हे सगळं प्रकरण समोर आणलं होतं. सुकेशने जॅकलिनला आणि तिच्या कुटुंबीयांना विविध महागड्या गोष्टी भेट म्हणून दिल्या होत्या. हे दोघंही दीर्घकाळ एकमेकांना डेट करत होते. या दोघांचे काही इंटिमेट फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
ADVERTISEMENT