IT Raid Dainik Bhaskar: ‘दैनिक भास्कर’ मीडिया ग्रुपवर आयकर खात्याने का केली छापेमारी?, नेटीझन्स म्हणतात…

मुंबई तक

• 02:42 PM • 22 Jul 2021

भोपाळ: दैनिक भास्कर या मीडिया ग्रुपच्या वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये आयकर विभागाने गुरुवारी एकाच वेळी छापा टाकले. कथित कर चोरीसंदर्भात हे छापा टाकण्यात आले असल्याची माहिती आयकर विभागातील सूत्रांकडून यावेळी देण्यात येत आहे. भोपाळ, जयपूर आणि अहमदाबादसह देशातील इतर काही ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. या संदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (CBDT)कोणतेही […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

भोपाळ: दैनिक भास्कर या मीडिया ग्रुपच्या वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये आयकर विभागाने गुरुवारी एकाच वेळी छापा टाकले. कथित कर चोरीसंदर्भात हे छापा टाकण्यात आले असल्याची माहिती आयकर विभागातील सूत्रांकडून यावेळी देण्यात येत आहे.

हे वाचलं का?

भोपाळ, जयपूर आणि अहमदाबादसह देशातील इतर काही ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

या संदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (CBDT)कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु अधिकृत सूत्रांनी सांगितले की, अनेक राज्यात चालणार्‍या या छाप्यांमध्ये हिंदी माध्यमांच्या मोठ्या समूहांचे प्रमोटर देखील सहभागी आहेत.

भास्कर ग्रुपवर IT कडून करण्यात आलेल्या छापेमारीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, ‘एजन्सी आपले काम करत आहे. सरकारची यात कोणतीही भूमिका नाही. दुसरे म्हणजे लोकांनी प्रथम सर्व माहिती तपासली पाहिजे, तरच त्यांनी काहीतरी बोलावे.’

कॉंग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, राजधानी भोपाळ येथील प्रेस कॉम्प्लेक्स येथील कार्यालयासह आवारात ग्रुपचे अर्धा डझन आयकर अधिकारी उपस्थित आहेत.’

राजदचे राज्यसभेचे खासदार मनोज झा यांनीही या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मीडियावर आता छापे पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 100 हून अधिक जणांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी ही छापेमारी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. दैनिक भास्करचे मालक सुधीर अग्रवाल यांच्या घरीही आयकर विभागाची टीम पोहोचली होती.

त्यांच्या घराबाहेर देखील सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले होते. यासह दैनिक भास्करच्या काही कार्यालयांना सील देखील करण्यात आलं असल्याचं समजतं आहे. दरम्यान, दैनिक भास्कर यांच्यावरील छापेमारीनंतर सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगली असून लोक मोदी सरकारवर जोरदार टीका करत आहेत.

आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मोदी सरकारवर टीका करत कॉंग्रेस पक्षाने लिहिले की, ‘भास्कर वृत्तपत्राच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा हा पत्रकारितेवरील तीव्र हल्ला आहे. हे आणखी पुष्टी करते की मोदी सरकारला सत्याचा सामना करण्याऐवजी गळा आवळण्याची इच्छा आहे.’

कोरोना काळात भास्कर समूहाने जे रिपोर्टिंग केलं होतं त्यात त्यानंतर सोशल मीडियावरुन अनेकांनी मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. अनेक सोशल मीडिया यूजरचं असं म्हणणं आहे की, सरकारच्या विरोधात केल्या गेलेल्या रिपोर्टिंगमुळे सध्या हे सगळं सुरु आहे. कॉंग्रेस नेते श्रीनिवास बिवी यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. यातील एक भाग होता जेव्हा भास्करने त्याच्या पहिल्या पानावर कोरोनामधील मृत्यूंबद्दल सत्य सांगण्याचा दावा केला होता.

Uddhav Thackeray यांचे सल्लागार अजॉय मेहता यांचा ‘तो’ फ्लॅट IT विभागाने केला सील

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले की, ‘मोदी सरकार आपली टीका सहन करू शकत नाही. भास्करवर छापा टाकून त्याने आपली सापळा रचणारी मानसिकता दर्शविली आहे.’ यावर भास्करने देखील असं म्हटलं आहे की, ‘लोकशाहीच्या हितासाठी पत्रकारिता करत राहू.’

    follow whatsapp