Jalgaon: एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंचा फोटो हातात घेऊन शिवसैनिकांची भावनिक यात्रा

मुंबई तक

• 11:18 AM • 23 Jun 2022

मनिष जोग, जळगाव, प्रतिनिधी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं आहे त्यामुळे अभूतपूर्व राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. शिवसेना हा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. कारण ३५ पेक्षा जास्त आमदारांचा एक गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेला आहे. या सगळ्यामुळे महाराष्ट्रात तसंच शिवसेनेत खळबळ माजली आहे. महाराष्ट्रातील घडत असलेली राजकीय परिस्तिथी आणि स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते […]

Mumbaitak
follow google news

मनिष जोग, जळगाव, प्रतिनिधी

हे वाचलं का?

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं आहे त्यामुळे अभूतपूर्व राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. शिवसेना हा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. कारण ३५ पेक्षा जास्त आमदारांचा एक गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेला आहे. या सगळ्यामुळे महाराष्ट्रात तसंच शिवसेनेत खळबळ माजली आहे.

महाराष्ट्रातील घडत असलेली राजकीय परिस्तिथी आणि स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते यांची होत असलेली कुचंबणा काय होते याचा प्रत्यय जळगाव शहरात आला. जळगावातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांचा फोटो हातात घेऊन एक भावनिक यात्राच काढली. जळगावात शिवसेनेचा पालकमंत्रीच गायब झाल्याने आज ही उद्धव ठाकरेंचा फोटो हात घेऊन रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. जळगावातील महापौर जयश्री महाजन यांनाही अश्रू अनावर झालेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना एक कुटुंब आहे , गेलेल्या आमदारांनी परत स्वगृही परत यावे अशी सार्थ हाक आज या शिवसैनिकांनी दिली.

राज्यसभा निवडणुकीच्या पाठोपाठ भाजपने विधान परिषद निवडणुकीतही त्यांचे आमदार निवडून आणले. त्या निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच २१ जूनला महाराष्ट्रातलं सर्वात मोठं राजकीय बंड समोर आलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतल्या आमदारांचा एक मोठा गट नॉट रिचेबल झाला. ते सगळे आमदार सुरतला असल्याचं कळलं. त्यानंतर हे सगळे आमदार गुवाहाटीला गेले आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही फेसबुक लाईव्ह करून शिवसैनिकांशी आणि महाराष्ट्राशी संवाद साधला

मी हवं तर मुख्यमंत्रीपद सोडतो, पण तुम्ही समोर या, माझ्याशी चर्चा करा. जे तुमचे आक्षेप आहेत ते स्पष्टपणे सांगा मी पद सोडतो असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यानंतर मुंबईत शिवसैनिकांची गर्दी झाली होती. त्यापाठोपाठ आता जळगावात शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंचा फोटो हातात घेऊन भावनिक मोर्चा काढला.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे तो एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानेच. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच एकनाथ शिंदे यांनी आव्हान दिलंय. राजकीय पेच राज्यात निर्माण झाला आहे. २१ जूनला हे बंड पुकारण्यात आलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे सगळे आमदार गुवाहाटीमध्ये गेले आहेत.

शिवसेनेला हादरा देणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले आमदार संजय शिरसाट यांनी आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्रातून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला असलेल्या नेत्यांवर अनेक धक्कादायक आरोप केले आहे. या नेत्यांना बडवे आणि कारकून चाणक्य असं म्हणत संजय शिरसाट यांनी गेल्या अडीच वर्षांपासून घडत असलेला प्रकार निदर्शनास आणून दिलाय.

त्यांनी पत्रात नाराजी व्यक्त केली असून हे पत्र एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे. तसंच आमदारांचं म्हणणं हेच आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंसह सगळ्याच बंडखोर आमदारांना ही ऑफर दिली आहे.

    follow whatsapp