आरएसएस, विहिंप, बजरंग दलही तालिबानसारखेच; गीतकार जावेद अख्तर यांचं विधान

मुंबई तक

• 09:03 AM • 04 Sep 2021

प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात सत्तेत आलेल्या तालिबानवर टीका केली आहे. तालिबानवर टीका करतानाच जावेद अख्तर यांनी भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यावरही निशाणा साधला. या तिन्ही संघटनांची जावेद अख्तर यांनी तालिबानसोबत तुलना केली आहे. अमेरिकेनं सैन्य माघारीचा निर्णय घेतल्यानंतर तालिबाननं अशरफ घनी यांचं सरकार उलथवून टाकलं. […]

Mumbaitak
follow google news

प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात सत्तेत आलेल्या तालिबानवर टीका केली आहे. तालिबानवर टीका करतानाच जावेद अख्तर यांनी भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यावरही निशाणा साधला. या तिन्ही संघटनांची जावेद अख्तर यांनी तालिबानसोबत तुलना केली आहे.

हे वाचलं का?

अमेरिकेनं सैन्य माघारीचा निर्णय घेतल्यानंतर तालिबाननं अशरफ घनी यांचं सरकार उलथवून टाकलं. एक एक प्रांत काबीज करत तालिबाननं संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला असून, तालिबानी राजवटीवरून जगभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतातही अफगाणिस्तानातील सत्तांवरून, तसेच तालिबानबद्दल भाष्य केलं जात असून, प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी तालिबानवर टीका केली आहे.

एका मुलखाततीत जावेद अख्तर यांनी तालिबान रानटी प्रवृत्तीची असल्याचं सांगत निशाणा साधला. भारतातून तालिबानी राजवटीचं स्वागत करणाऱ्या प्रतिक्रियाही उमटल्या. त्यावर बोलताना जावेद अख्तर म्हणाले, ‘तालिबानी रानटी वृत्तीचे असून, त्याची कृत्ये निंदा करावीत अशीच आहेत, याबद्दल कोणतीही शंका नाही. तालिबानचं समर्थन करणाऱ्यांची विधानं मला नक्की आठवत नाही, पण अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीचं स्वागत करणारी होती’, असं जावेद अख्तर म्हणाले.

‘मी इतकंच म्हणेन भारतातील मुस्लिम तरुणांना चांगलं काम, चांगलं शिक्षण आणि स्वतःच्या मुलांसाठी चांगली शाळा हवीये. पण, दुसरीकडे असेही लोक आहेत, जे रुढीवादावर विश्वास ठेवतात. महिला व पुरुष यांना वेगवेगळ्या पद्धतीने वागवलं जातं. अशा जुन्या पद्धतीवर विश्वास ठेवणारेही आहेत’, असं मत त्यांनी मांडलं.

‘बुरसटलेल्या विचारांच्या लोकांची संख्या खूप कमी आहे. त्यांना जे म्हणायचं म्हणत राहू द्या. ते त्यात यशस्वी होणार नाहीत. जगभरातील हिंदूत्ववाद्यांनाही असंच हवं आहे. तालिबान, इस्लामिका राष्ट्रांना जे हवंय, तसंच यांना हिंदू राष्ट्र हवं आहे. हे एक लोक एकाच मानसिकतेचे आहेत’, असंही जावेद अख्तर म्हणाले.

‘तालिबान रानटी वृत्तीची आहे, यात कसलीही शंका नाही. पण, आरएसएस, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांना पाठिंबा देणारे, त्यांचं समर्थन करणारेही तालिबानचं समर्थन करणाऱ्यांसारखेच आहेत. भारत समाजवादी (सेक्युलर) देश आहे. त्यामुळे तालिबानचा विचार कोणत्याही भारतीयाला पटणार नाही. या देशातील जास्त लोक हे सभ्य आणि सहनशील आहेत’, असं मत जावेद अख्तर यांनी मांडलं.

    follow whatsapp